कोकण

-निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी

CD

राजापुरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे
राजकीय हालचालींना वेग ; ५१ ग्रामपंचायती
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १८ ः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता गावोगावच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. यामध्ये तालुक्यामध्ये १०१ पैकी तब्बल ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोर्चेबांधणीला वेग आला आहे.
तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच मुदत संपली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती झाली आहे. एका बाजूला ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. सद्यःस्थितीमध्ये निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी ती लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदार याद्या अद्ययावत करण्यासह अन्य तयारीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. निवडणुकीची घोषणा होताच गावागावात प्रचाराचा धुरळा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
----
चौकट
लक्षवेधी थेट सरपंच निवड
राज्यातील सत्ताधारी महायुती शासनाने जनतेतून थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार थेट नगराध्यक्ष निवडीच्या निवडणुका झाल्या असून, त्यानंतर आता थेट सरपंच निवडही होणार आहे. सरपंच निवडीची आरक्षण सोडत यापूर्वीच झाली असून, या आरक्षणानुसार इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. थेट सरपंच निवड राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसमोर आव्हानात्मक राहणार असल्याने इच्छुकांसह राजकीय पक्षांसह सरपंच निवडीचे उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
---------
चौकट
निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती
कारवली, निवेली, पांगरी खुर्द, शिवणेखुर्द, कोंडसर बुद्रुक, गोठणेदोनिवडे, करक, चिखलगाव, रायपाटण, शीळ, पांगरे बुद्रुक, तुळसवडे, पन्हळेतर्फ सौंदळ, फुपेरे, सोलगाव, तारळ, अणसुरे, मंदरूळ, महाळुंगे, येरडव, काजिर्डा, ससाळे, पडवे, हातदे, सौंदळ, वाडापेठ, कोदवली, तळगाव, आडवली, आंबोळगड, चुनाकोळवण, दळे, जवळेथर, कशेळी, परटवली, मोसम, मोरोशी, मिळंद, गोवळ, कोंडीवळे, ताम्हाणे, वाल्ये, धोपेश्‍वर, ओणी, दोनिवडे, हरळ, ओशिवळे, कुंभवडे, कोळंब, कुवेशी, उन्हाळे, कणेरी, शेढे, कोंड्येतर्फ राजापूर, भू, तेरवण, खिणगिणी, दसूर, पेंडखळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

School Bus Strike: परीक्षांच्या तोंडावर स्कूल बस संघटनेचा संपाचा इशारा!'या' दिवशी राज्यभर सेवा ठप्प ठेवणार, मागण्या काय?

Ajit Pawar Plane Crash: ''दादाच राहिला नाही, आता खरं-खोटं करून काय उपयोग?'' सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Teacher News: महत्त्वाची बातमी! शाळेतील शिक्षकांना नियमित करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वेतनश्रेणीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT