कोकण

माहेर संस्थेचा चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

CD

‘माहेर’च्या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. या निमित्त माहेर संस्था आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
स्पर्धा गट इ. पाचवी ते बारावी व खुला गट अशा दोन गटात ही पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र, शिवकालीन कोणत्याही एका किल्ल्याचे चित्र, शिवराज्याभिषेक चित्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील एक धाडसी प्रसंग हे विषय चित्रकला स्पर्धेसाठी होते. या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे समाजातून प्रतिसाद मिळाला. दोन्ही गटाची मिळून एकूण ५० चित्रे संस्थेकडे जमा झाली होती. या स्पर्धेमध्ये पाचवी ते बारावी या गटामध्ये प्रथम ऋषभ कोतवडेकर, द्वितीय सुनिधी मोटेगावकर, (मालाड), तृतीय आरती अहिरे (गोरेगाव पूर्व), खुल्या गटांमध्ये प्रथम प्राची बलेकर (सैतवडे), द्वितीय खुशी पराडकर (शिरगाव), तृतीय नेत्रा मेस्त्री (राजापूर) यांनी मिळवला. विजेत्यांना हातखंबा- निवळीफाट्याजवळ माहेर संस्थेत १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: बलात्काराच्या गुन्ह्यासाठी पुरुषाच्या जननेंद्रियाचा स्त्रीच्या जननेंद्रियात प्रवेश करणे आवश्यक; उच्च न्यायालयाचा निर्णय

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

Bike Accident : कात्रजमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू

Sewage Water Issue : पुणे शहरात ७० ठिकाणी पिण्याच्या पाण्यात मैलापाणी

SCROLL FOR NEXT