‘आयआयए’तर्फे आज मंथन परिसंवाद
रत्नागिरी, ता. १८ : शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ‘मंथन’ या उपक्रमाचे आयोजन आयआयए रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. गुरूवारी (ता. १९) सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत ही कार्यशाळा मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन सिडकोचे माजी मुख्य वास्तुविशारद आर्किटेक्ट दिनकर सामंत करणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नगररचना, सार्वजनिक पायाभूत सुविधा विकास आणि प्रकल्प अंमलबजावणीचा सामंत यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टिकोनातून परिसंवाद होणार आहे. शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि संधी या दोन्हींचा सखोल विचार या कार्यक्रमात होणार आहे. शहरी नियोजन व पायाभूत सुविधा, पर्यावरणीय पुनरुज्जीवन व पर्यावरणीय समतोल, सार्वजनिक मोकळी मैदाने व वाहतूक व्यवस्था, संसाधन व्यवस्थापन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील सजग, जाणकार आणि विकासाच्यादृष्टीने योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.