कोकण

कुडाळात पोवाड्यांतून शिवशौर्याचा जागर

CD

25389

कुडाळात पोवाड्यांतून शिवशौर्याचा जागर

स्पर्धेला प्रतिसाद ः विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी रसिक मंत्रमुग्ध

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १८ ः येथील सावंतवाडी संस्थान मराठा समाज भगिनी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोवाडा गायन स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडे सादर करून शाळकरी मुलांनी बहारदार शिवकालीन माहोल निर्माण केला.
या स्पर्धेत कुंभारवाडी एमआयडीसी येथील शाळा, सांगिर्डेवाडी शाळा, पणदूर शाळा क्र. २, पडतेवाडी शाळा, कुडाळ कन्या शाळा, कविलकाटे शाळा, कुंभारवाडी केळबाई मंदिर शाळा, कुडाळ हायस्कूल प्राथमिक विभाग अशा विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसोबत पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा पहिली ते चौथी तसेच पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये घेण्यात आली. एकूण ४३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल असा ः पहिली ते चौथी-सुरेश मार्गी (कुंभारवाडी शाळा), गोविंद घाडी (कुंभारवाडी केळबाई मंदिर शाळा), मृणाल तौर (कुंभारवाडी एमआयडीसी), उत्तेजनार्थ प्रथम नेहा मुगडे (कुंभारवाडी केळबाई मंदिर), द्वितीय गार्गी वाळके (पणदूर शाळा क्र. २). पाचवी ते सातवी-मधुकर बांबुळकर (बांबुळी), पृथा पुजारी (कन्याशाळा), विनायक गोसावी (कुडाळ हायस्कूल), उत्तेजनार्थ प्रथम हिमेश पवार (कुडाळ हायस्कूल), द्वितीय रोशनी राठोड (कन्याशाळा कुडाळ).
पहिली ते चौथी परीक्षण डॉ. दीपाली काजरेकर व प्रा. अनुष्का रेवंडकर यांनी, पाचवी ते सातवीचे परीक्षण मंगेश मराठे, दीप्ती प्रभू यांनी केले. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक भगिनी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. काजरेकर यांनी केले. व्यासपीठावर परीक्षक मराठे, रेवंडकर यांच्यासह दीप्ती प्रभू, गुरुदास शिरसाट, उपाध्यक्षा स्वाती सावंत, अदिती सावंत, संगीता नलावडे, वेदिका सावंत, निर्मला पाटील, प्रज्ञा राणे उपस्थित होत्या. कार्यक्रमास मराठा समाज स्थानिक समिती, कुडाळचे सहकार्य लाभले. प्रज्ञा राणे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

T20 WC, IND vs NED: ...अन् मोठा अनर्थ थोडक्यात टळला! सूर्यकुमार - रिंकू सिंगची जोरात धडक अन् चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; Video

Chhatrapati Shivaji Maharaj:विदर्भभूमी शिवरायांच्या पदस्पर्शाने ६ वेळा पावन, आग्रा कैदेतून सुटल्यानंतर विदर्भातून प्रवास

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Maratha Empire: मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा एकतर्फी हटवला; भोसले घराणे संतापले, कुणावर केले गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT