कोकण

विहिरी बंदिस्त करण्याचा प्रस्ताव

CD

- rat१८p८.jpg-
२६O२५३७१
राजापूर येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचे संग्रहित छायाचित्र.
----
बिबट्यांचे जीव वाचवण्याची मोहीम
वनविभाग ; ६५० पडीक विहिरींना कठडे बांधणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जिल्ह्यातील पडीक असलेल्या विहिरींमध्ये भक्ष्याच्या शोधात बिबटे पडतात. त्यातून त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा उघड्या विहिरींमध्ये बिबटे पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता वनविभागाने जिल्ह्यातील ६५० पडीक विहिरींच्या कठड्यांच्या बांधकामासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी वनविभागाअंतर्गत दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी विभाग आहेत. या सर्वच विभागांमध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ४० बिबटे विहिरीत पडण्याच्या घटना घडतात. अनेकदा वेळीच मदत न मिळाल्याने किंवा विहिरीत पाणी जास्त असल्याने या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. हे अपघात रोखणे आता वनविभागासमोर मोठे आव्हान ठरले आहे.
उघड्या विहिरींच्या या कामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. यासाठी वनविभागाने केवळ आपल्या आर्थिक अंदाजपत्रकावर अवलंबून न राहता इतर मार्गांचाही विचार सुरू केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनांतून निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे कठडे बांधणी शक्य आहे का, याबाबतही प्रशासकीय पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.
-----
चौकट १
जनजागृतीची गरज
वनविभागाच्या या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. शासकीय निधी उपलब्ध होईपर्यंत शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी आपल्या शेतातील पडीक विहिरींवर तात्पुरते कुंपण किंवा जाळी बसवावी, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP Investment : FD सोडून आता SIP कडेच लोकांचा कल! 5 मोठी कारणे जी बदलत आहेत बचतीची पद्धत

पाकिस्तानी खेळाडूंवर 'भांडी' घासण्याची वेळ, हॉटेलमध्ये राहण्याचे पैसे नाही भरले अन्... कर्णधाराला संताप अनावर, बोर्डावर केले आरोप

थलायवा रजनीकांत घेणार अभिनयातून निवृत्ती ? शेवटच्या सिनेमाच्या शूटिंग लवकरच सुरु होणार

PAK vs NAM, T20 WC : भारताविरुद्ध भोपळा अन् लिंबूटिंबू संघाविरुद्ध शतक! पाकिस्तानची दुबळ्या संघासमोर मर्दुमकी, २०० धावांचे लक्ष्य

Latest Marathi News Live Update : पुणे - इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT