कोकण

धाडवे, डोंगरेंचा सत्कार

CD

आमदार सामंताकडून
धाडवे, डोंगरेचा सत्कार
पाली ः लांजा-राजापूर मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांनी पाली नं. १ शाळेला नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी रत्नागिरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्याबाहेर अभ्यासदौऱ्यासाठी निवड झालेल्या हर्ष धाडवे आणि यश डोंगरे या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश शिंदे, उपाध्यक्ष प्रार्थना ठीक, विद्यार्थी सुरक्षा समितीचे सदस्य अ‍ॅड. सागर पाखरे, मनीषा करळकर, जान्हवी पांचाळ, स्नेहा शिंदे, विनायक राऊत, संतोष पांचाळ उपस्थित होते. सामंत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन अमूल्य असे मार्गदर्शन केले. तसेच माझी मातृशाळा आहे तसेच शालेय अनेक गरजांची पूर्तता करू, असे सांगितले.

‘मनाचे श्लोक’मध्ये
दिव्या जड्यार प्रथम
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजनच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मनाचे श्लोक पठण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. समर्थ भारत अभियान सज्जनगड संस्थानच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १०वीला शिकणाऱ्या दिव्या जड्यार ही राज्यस्तरावर प्रथम आली तर आदिती कातकरला द्वितीय क्रमांक मिळाला असून, विदिता मोने व कल्याणी साठे या दोघींना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. खुल्या गटातून प्रशालेतील प्रयोगशाळा सहाय्यक सचिन साठे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. ही स्पर्धा नुकतीच पुणे येथे झाला.


भिंगळोलीत
रुग्णांना फळवाटप
मंडणगड ः गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना मंडणगड तालुक्याच्यावतीने भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. या वेळी पंचायत समिती सदस्या प्रणाली चिले, दीप्ती घडशी, शिवसेना विभागप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य दीपक मालुसरे, सुजित देवकर, शिवसेना सचिव सिद्धेश देशपांडे, विभाग संघटक नीलेश रक्ते, युवासेना तालुका संघटक विकास पवार, प्रतीक पोतनीस, विभाग अधिकारी नीतेश सावंत, कांतीलाल धामणे, सरपंच किरण नाकती तसेच तालुक्यातील शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले

मुंडे महाविद्यालयाची
राजस्थान सहल
मंडणगड ः लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेली राजस्थान अभ्यास सहल नुकतीच उत्साहात पार पडली. या सहलीत विद्यार्थ्यांनी जयपूर व उदयपूर परिसरातील ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांना भेट देत प्रत्यक्ष माहितीचा अनुभव घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. मुकेश कदम व प्रा. संदीप निर्वाण सहभागी झाले होते तर डॉ. सूरज बुलाखे व प्रा. शरीफ काझी यांचे सहकार्य लाभले. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी अल्बर्ट वस्तुसंग्रहालय, जंतरमंतर, अमेर किल्ला, सिटी पॅलेस, हवामहल, जलमहल, हिंदुस्थान झिंक तसेच राजस्थान विद्यापीठ, जयपूर आदी ठिकाणांना भेट देऊन ऐतिहासिक, वैज्ञानिक व शैक्षणिक माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना चार भिंतीबाहेरील जग, निसर्ग, गडकिल्ले, उद्योग व शैक्षणिक संकुलांची ओळख व्हावी तसेच त्यांच्यात अभ्यासाबद्दल प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने सहलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

Latest Marathi News Update: नऱ्हे येथे पीएमपी बस अपघात; चालकाला फिट आल्याने बस कठड्यावर धडकली

स्वतः वाघ्या म्हणून काम केलं, महिलांचं शोषण जवळून पाहिलं; दिग्दर्शक अभिषेक जावीरने सांगितला 'फुला'चा थरार!

Beed News: परफेक्ट च्या शोधात अनेक जण रिजेक्ट; तरुणींच्या अटींमुळे तरुणांचे वय चालले वाढत; शेतकरी मुलांना नकारच

SCROLL FOR NEXT