कोकण

कामळेवीर शाळेचे ''सुंदर शाळा'' स्पर्धेत यश

CD

swt193.jpg
25644
झाराप कामळेवीर शाळा

झाराप कामळेवीर शाळेचे
‘सुंदर शाळा’ स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः झाराप कामळेवीर (ता. कुडाळ) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने राज्याच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा क्र. ३’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेला २ लाखांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, उपक्रमशील व नाविन्यपूर्ण कृतींमुळे हे यश शक्य झाले. ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत झाराप तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असल्याचे मुख्याध्यापक श्री. कदम यांनी सांगितले.
मुख्याध्यापक कदम यांच्यासह श्रीम. निरवडेकर, श्री. गोठोस्कर, श्री. आजगावकर व श्रीम. राऊळ यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी शाळेचे अभिनंदन करून जिल्हास्तरावर अधिक उज्ज्वल यश मिळविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
.....................
swt194.jpg
25645
निरवडे ः येथे संदीप गावडे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

संदीप गावडे यांचा
निरवडे येथे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नवनिर्वाचित सदस्य संदीप गावडे यांचा निरवडे आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. ​या सत्कार समारंभाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आदेश जाधव यांच्यासह रोहन मल्हार, प्रकाश जाधव, नाथा जाधव, भीमसेन जाधव, महेश जाधव आणि सुनील जाधव आदी उपस्थित होते.
आंबेडकरनगर येथील ग्रामस्थांनी गावडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ​यावेळी गावडे यांनी, ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मतदारसंघातील विकासकामांना गती देणे आणि सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणे, हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा राजीनामा! भावनिक पोस्ट करत शेअर केला २३ वर्षांचा प्रवास

Bee Attack on Cricket Match : क्रिकेट सामन्यावर मधमाशांचा हल्ला!, १० मिनिटांत ५० हून अधिक मधमाशांनी 'डंक' दिल्याने ‘अम्पायर’चा मृत्यू

Latest Marathi News Live Update : चाळीसगाव शहरात शिवजयंतीच्या कार्यक्रमात पोलिस आणि शिवप्रेमीत बाचाबाची

"टॉयलेट स्वच्छ नाही, मेकअपरूममध्ये.." मराठी अभिनेत्रीचा नाट्यगृहांबाबत खुलासा "बऱ्याचदा आम्ही.."

शिंदेंची शिवसेना घेणार बीएमसीच्या महापौरपदाची धुरा! भाजपसोबत दीड वर्षांचा फॉर्म्युला ठरला; सत्तेचे समीकरण बदलले

SCROLL FOR NEXT