कोकण

चित्रकला स्पर्धेमध्ये मयुरी, हर्षाली प्रथम

CD

swt1910.jpg
25640
कळणे ः चित्रकला स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले विद्यार्थी.

चित्रकला स्पर्धेमध्ये
मयुरी, हर्षाली प्रथम
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ : शिवजयंतीचे औचित्य साधून नूतन विद्यालय कळणे या प्रशालेमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. मोठ्या गटातून मयुरी गावकर तर लहान गटातून हर्षाली नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक, युद्धनीती, दरबार महाराजांची प्रतिमा, गड किल्ले अशा विविध विषयांवर चित्रकलेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला. या स्पर्धेचे आयोजन प्रशालेचे शिक्षक संजय तायवाडे यांनी केले. ही स्पर्धा प्रशालेचे कर्मचारी मधुकर गावकर यांनी प्रायोजित केली होती. स्पर्धेत लहान गटात प्रथम हर्षाली नार्वेकर, द्वितीय प्रसाद देसाई, मोठ्या गटात मयुरी गावकर प्रथम, द्वितीय उर्वी देसाई यांनी यश मिळविले. स्पर्धेचे परीक्षण प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक प्रशांत राऊळ, उमेश देसाई यांनी केले. यावेळी शिक्षक सतीश धर्णे, अच्युत गावडे, शिक्षिका निकिता सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT