swt1916.jpg
25699
वैभववाडी ः खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे येथे रस्ता खोदण्यात आला होता.
परवानगीविना रस्ता खोदला
खारेपाटण-गगनबावडा मार्ग : ''बांधकाम''कडून ठेकेदाराविरुद्ध तक्रार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे आणि तिरवडे तर्फ खारेपाटण अशा दोन ठिकाणी कालव्याच्या ठेकेदाराने रस्ता खोदल्याची तक्रार बांधकाम विभागाने पोलिस आणि तहसीलदारांकडे केली आहे.
अरुणा प्रकल्पाच्या कालव्यांची कामे सध्या सुरू आहेत. ही कामे करताना कालव्याच्या ठेकेदारांकडून कोणतेही नियम पाळले जात नसल्याची तक्रार यापूर्वी अनेकदा आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मांगवली येथे रस्ता खोदण्यात येत होता. हे काम तेथील ग्रामस्थांनी रोखले होते. त्यानंतर सात-आठ दिवसांपूर्वी खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे आणि तिरवडे तर्फ खारेपाटण अशा दोन ठिकाणी कालव्याच्या ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता रस्ता खोदला आणि जलवाहिनीचे काम पूर्ण देखील केले. यासंदर्भात काही ग्रामस्थांनी तक्रारी केल्यानंतर बांधकाम विभागाने आता याची दखल घेतली आहे. बांधकाम विभागाने बुधवारी (ता. १८) तहसीलदार, पोलिस निरीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार दिली आहे. याशिवाय पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी देखील पत्रव्यवहार केला आहे.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.