कोकण

कणकवली : क्रिकेट स्पर्धा

CD

फोटो : kan192.jpg
25706
वरवडे : येथील क्रिकेट स्पर्धेतील विजेत्‍या सँडी स्पोर्टस्‌ संघाला माजी सभापती प्रकाश सावंत यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.

वरवडे येथील क्रिकेट स्पर्धेत सँडी स्पोर्टस विजेता
आदर्श पिसेकामते संघ उपविजेता : वरवडे कोष्‍टीवाडी मित्रमंडळाचे आयोजन
कणकवली, ता.१९ : तालुक्‍यातील कोष्‍टीवाडी मित्रमंडळ, वरवडे आयोजित क्रिकेट स्पर्धेत ‘सॅंडी स्पोर्ट्स’ संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम पारितोषिक पटकावले, तर ‘आदर्श पिसेकामते’ संघाने द्वितीय पारितोषिक मिळवले. मालिकावीर पुरस्कार ‘सॅंडी स्पोर्ट्स’च्या पार्थ याने मिळवला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अजिंक्य (सॅंडी स्पोर्ट्स) याचा गौरव करण्यात आला, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सिध्देश (आदर्श पिसेकामते) याने मान पटकावला.
वरवडे कोष्‍टीवाडी येथील पटांगणात या स्पर्धा झाल्या. मंडळाच्या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेतील विजेत्‍या आणि उपविजेत्‍या संघाला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश सावंत आणि सुभाष मालंडकर यांच्याहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून विराज खामकर व सागर राणे यांनी जबाबदारी पार पाडली. समालोचनाची धुरा संतोष परब, प्रमोद तेली व राजू निर्गुण यांनी तर ग्राउंड पिचची जबाबदारी दिपक पोयेकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विजय कडुलकर, प्रशांत सावंत, संदिप राणे, दर्शन पोयेकर, तेजस पोयेकर, तुषार बुचडे, स्वप्निल सावंत, दिपक पोयेकर, नरेंद्र कांबळी, शरद लाड, संतोष सावंत, प्रभाकर बुचडे, श्रीकांत सावंत, रविराज कांबळी, सुशांत सावंत, सुभाष सावंत, संतोष राणे, अक्षय पोयेकर, संतोष परब, विराज खामकर, नागेश राणे, शैलेश राणे, सागर राणे तसेच पार्थ राणे, रोहन राणे, हर्ष सावंत, वंश राणे, श्रीतेज बुचडे, सिद्धेश तवटे, मकरंद अपराज, दिव्या सावंत, श्रेया बुचडे आदींनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT