फोटो :kan193.jpg
25719
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री नितेश राणे, बाजूला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पाटील, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ.दवंगे
सिंधुदुर्गात दर तीन महिन्यांनी
स्पेशालिटी मेडिकल कॅम्प
नितेश राणे : २७ फेब्रुवारीला कणकवलीत पहिला मेगा कॅम्प
कणकवली, ता. १९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत जनतेमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी स्पेशालिस्टी मेडिकल मेगा कॅम्प लावला जाणार आहे. यात सर्व प्रकारच्या दुर्धर आजारावर रुग्णांची तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयात नियमित डॉक्टर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी गोवा किंवा कोल्हापूर येथे जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी दर तीन महिन्यांनी सिंधुदुर्गात स्पेशालिटी मेडिकल कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कॅम्पसाठी आवश्यक खर्च जिल्हा नियोजनमधून केला जाणार आहे.
ते म्हणाले, या विशेष कॅम्पमध्ये जिल्ह्यात उपलब्ध नसलेले तज्ज्ञ डॉक्टर इतर जिल्ह्यांतून तसेच मुंबईतून बोलावले जाणार आहेत. रुग्णांची सविस्तर तपासणी करून निदान झाल्यानंतर त्यांना तीन महिन्यांचा औषध साठा दिला जाईल. पुढील कॅम्पमध्ये त्यांची पुनर्तपासणी आणि आवश्यक उपचार केले जाणार आहेत असे श्री.राणे म्हणाले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, २७ फेब्रुवारी रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पहिला मेगा मेडिकल स्पेशालिटी कॅम्प होणार आहे. त्याआधी पाच तालुक्यांतील शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाईल. यात २३ फेब्रुवारीला वैभववाडी, २४ फेब्रुवारीला देवगड व कणकवली, तर २५ फेब्रुवारीला कुडाळ आणि मालवण येथे तपासण्या होणार आहेत. त्यानंतर अधिक उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना कणकवली येथील मेगा कॅम्पमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
या कॅम्पमध्ये ग्रंथीरोग, डायबेटिस, स्त्रीरोग, कर्करोग, पोटाचे विकार, बालरोग, अस्थिरोग, मूत्रविकार आदी विभागांचा समावेश असून तज्ज्ञांकडून तपासणी व उपचार केले जाणार आहेत. आवश्यक असल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. डॉ. अनंत दवंगे यांनी सांगितले की, या कॅम्पसाठी लागणारे सर्व डॉक्टर व वैद्यकीय सुविधा सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजतर्फे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.