कोकण

किल्ले सिंधुदुर्ग शिवगर्जनांनी दुमदुमला

CD

swt1918.jpg
25769
मालवण ः शिवजयंतीनिमित्त किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांना माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते जिरेटोप, पुष्पहार अर्पण करण्यात आला.

किल्ले सिंधुदुर्ग शिवगर्जनांनी दुमदुमला
ठाकरे सेनेतर्फे शिवजन्मोत्सव ः छत्रपतींच्या मूर्तीला जिरेटोप अर्पण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १९ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे वैभव असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग येथील ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिरात आज ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने संपूर्ण किल्ला भगवामय झाला होता.
सकाळपासूनच शिवसैनिकांनी भगव्या शाली, भगवे झेंडे आणि भगवे फेटे परिधान करून किल्ल्यावर गर्दी केली होती. ''छत्रपती शिवाजी महाराज की, जय!'', ''जय भवानी, जय शिवाजी!'' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. लेझीम नृत्य आणि ढोल-ताशांच्या गजरात किल्ल्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी श्री. नाईक यांनी शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींच्या मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले आणि तमाम जिल्हावासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव ऐतिहासिक शिवराजेश्वर मंदिर आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी हा उत्सव परंपरेने साजरा केला जातो. विशेष म्हणजे, माजी आमदार नाईक यांच्या पुढाकाराने या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले असून, मंदिरात दगडात कोरलेले अत्यंत आकर्षक असे सिंहासन उभारण्यात आले आहे. या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात.
या सोहळ्याप्रसंगी पुजारी श्री. सकपाळ, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, प्रा. मंदार सावंत, नितीन राऊळ, किल्ला रहिवाशी मंगेश सावंत यांच्यासह वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, तळगाव सरपंच लता खोत, रेवंडी सरपंच अमोल वस्त, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, अनिता गिरकर, पूजा करलकर, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, अमित भोगले, राहुल सावंत, उदय दुखंडे, सचिन रेडकर, संजना रेडकर, सिद्धेश मांजरेकर, माधवी प्रभू यांच्यासह अनेक शिवसैनिक व किल्ला रहिवासी उपस्थित होते.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT