ठाकरेसेनेसह कॉंग्रेसला आत्मपरीक्षणाची गरज
जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव ; शिवसेनेचे वर्चस्व
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १९ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (शिंदे) ११, भाजप १ अशी स्थिती आहे. महायुतीने १२ जागांवर एकतर्फी विजय संपादन केला. या विजयामुळे विरोधकांचा धुरळा उडाला आहे. या पराभवामुळे तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी लांजा नगरपंचायतीत नगराध्यक्षांसह दहा नगरसेवक निवडून आणत वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले. जिल्हा परिषद गटाच्या चार आणि पंचायत समिती गणाच्या आठ अशा एकूण १२ जागांमधून शिवसेनेचे ११ तर भाजपचा पंचायत समिती गणातून एक उमेदवार निवडून आला. या निवडणुकीत ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसच्या पराभवामागे सक्षम उमेदवारांचा अभाव हे प्रमुख कारण ठरले. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक बडे पदाधिकारी आमदार सामंत यांनी आपल्याकडे खेचले होते. त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली. त्याउलट विरोधकांना आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आवश्यक ताकद पुरवता आली नाही. त्याचा फटका निवडणुकीतील निकालातून स्पष्ट झाला आहे. या विजयामुळे लांजा तालुक्यात शिवसेनेने एकतर्फी वर्चस्व सिद्ध झाले आहे. आमदार सामंत यांच्या नेतृत्वावर जनतेचा दृढ विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे तर पराभूत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि काँग्रेससमोर संघटनात्मक पुनर्बांधणीचे मोठे आव्हान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.