असुर्डेत तिहेरी अपघातात पादचारी ठार
दोन जखमीमध्ये दोन वाहन चालकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १९ ः मुंबई- गोवा महामार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात एक ठार तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात असुर्डे-बौद्धवाडी (ता. चिपळूण) येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.
सावर्डे पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार अशोक मादगे (वय ३५, रा. साडवली, देवरूख) हे मोटारीने पुणे ते साडवली असा प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रूपाली व मुलगी साजिरी होत्या. ते असुर्डे-बौद्धवाडी येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्या वेळी मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या गिरीश चंद्रकांत गावडे (रा. माहीम, मुंबई) यांच्या मोटारीने पादचारी विजय बाबाराम सावर्डेकर (वय ५५, रा. बौद्धवाडी, असुर्डे) यांना धडक देऊन शेजारी उभ्या असलेल्या मादगे यांच्या मोटारीला आणि सुयोग तानाजी हुमणे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये पादचारी विजय बाबाराम सावर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक सुयोग तानाजी हुमणे आणि मोटारचालक गिरीश गावडे हे जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात हलवले. या प्रकरणी सावर्डे पोलिस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.