25927
वरवडे : शिवजयंती उत्सव समितीतर्फे काढलेल्या दुचाकी फेरीच्या शुभारंभप्रसंगी युवा नेते प्रताप भोसले, कान्हा मालंडकर, करूणा घाडीगांवकर, सुदाम तेली, स्वप्नील चिंदरकर, सुभाष मालंडकर, इब्राहीम शेख, निसार शेख, संजय साळसकर, बाळा सावंत आदी.
25928
कणकवली : शिवजयंती उत्सव समितीतर्फे काढलेल्या भव्य दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झालेले शिवभक्त.
शिवरायांच्या जयघोषणाने कणकवली दुमदुमली
शिवजयंतीचा उत्साह; उत्सव समितीच्या दुचाकी फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता.२० : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे शिवजयंतीदिनी वरवडे ते कणकवली अशी दुचाकी फेरी काढून शिवरायांचा जयघोष करण्यात आला. या फेरीत तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही फेरी काढण्यात आली.
फेरीचा प्रारंभ सामाजिक कार्यकर्ते कान्हा मालंडकर यांच्या हस्ते वरवडे येथे करण्यात आला. वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, माजी उपसरपंच आनंद घाडीगावकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, माजी सरपंच निसार शेख, माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, पिसेकामते माजी सरपंच सुहास राणे, बिडवाडी माजी सरपंच सुदाम तेली, संजय साळसकर, संतोष उर्फ पप्पू पुजारे आदी सहभागी झाले होते.
वरवडे येथे प्रारंभ झालेली रॅली कलमठ बाजारपेठेत दाखल झाली. तेथे शिवजयंती उत्सव समिती कलमठ यांच्यातर्फे बाबू राऊळ यांनी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रताप भोसले आणि उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर ही फेरी कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल झाली. तेथे माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर कणकवली शहरातील शिवाजी महाराज नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर मित्रमंडळाच्या वतीने माजी नगरसेवक उमेश वाळके व अन्य नागरिकांनी रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर ही फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल झाली. तेथे शिवाजी महाराज चौक मित्रमंडळातर्फे डॉ. विद्याधर तायशेटे यांनी रॅलीचे स्वागत केले. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला.
---
जिल्हाभरातील शिवभक्त सहभागी
या फेरीमध्ये काका कदम, इब्राहीम शेख, सुभाष मालंडकर, अमोल घाडीगांवकर, सोहेल खान, सुमंत सावंत, सिझर फर्नांडिस, बाळा बावकर, संदेश चिंदरकर, बाबजी चव्हाण, पुरुषोत्तम लाड, अनंत मगर, आनंद साटम, दिनेश सावंत, कुणाल देसाई, अभिजीत देसाई, आनंद बांदल, रुपेश नाडकर्णी, नीतेश पवार, प्रविण उर्फ बाळा सावंत, स्वरुप कोरगांवकर, समीर कदम, बंड्या मालंडकर, औदुंबर राणे, सागर राणे आदींसह जिल्हाभरातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.