कोकण

गुहागर ः गोपाळगडावर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

CD

rat20p6.jpg-
25883
गुहागर ः येथील गोपाळगडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

गोपाळगडावर शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २० : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा ठेवा जतन करणाऱ्या शिवतेज फाउंडेशन व अंजनवेल येथील शिवप्रेमींतर्फे शिवजयंती उत्सवानिमित्ताने काल (ता. १९) गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते किल्ले गोपाळगड अशी शिवपादुकांची मिरवणूक काढली.
सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आणि श्रीफळ वाढवून मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्या आधी शिवपादुकांचे पूजन केले.
गुहागर येथून निघालेली शिवमिरवणूक गुहागर बाजारपेठमार्गे वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिरात आगमन झाले. या ठिकाणी ब्रह्मवृंदाच्या मंत्रोघोषात पूजन व जगदंबेची भेट झाली. अंजनवेल गोपाळगड येथे स्थानिक ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावरील गीतावर नृत्य व पोवाडे सादर केले. या वेळी पादुका पूजन व ध्वजारोहण करून शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यासाठी शिवतेज फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, सचिव नीलेश गोयथळे, संचालक संतोष वरंडे, राजेंद्र आरेकर, सुधाकर कांबळे, सिद्धिविनायक जाधव, बाबासाहेब राशिनकर, सोहम सातार्डेकर, शामकांत खातू, प्रताप शिर्के, वैभव घुमे, शीतल साळवी, आत्माराम मोरे, अंजनवेल सरपंच सोनल मोरे, नंदकुमार खेतले, विवेक खेतले, उदेश सावंत, समीर धामणस्कर आदींसह अनेकांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT