कोकण

संक्षिप्त

CD

शिवाजी महाराज जन्मोत्सव
कुंभारवाडीत साजरा
लांजा, ता. २० ः लांजा शहरातील कुंभारवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी स्वरा मुळे या विद्यार्थिनीचे भाषण लक्षवेधी ठरले. या कार्यक्रमाला जमातुल मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शौकत नाईक, उबाठा शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश करंबेळे, नगरसेवक पंढरीनाथ मायशेट्ये, नगरसेविका श्रद्धा तोडकरी, शहरप्रमुख मोहन तोडकरी, नाना मानकर, लांजा तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, लहु खामकर, उद्योजक आश्रफ रखांगी, उबाठा पक्षाच्या माजी उपनगराध्यक्ष पूर्वा मुळे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलने झाली. या वेळी सुधाकर कांबळे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्याचा आढावा घेत असताना शिवाजी महाराज यांच्या मावळ्यामध्ये हिंदू-मुस्लिम असे सर्वधर्माचे लोक होते, असे सांगून कार्याचा गौरव केला.
या प्रसंगी खामकर म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येक घरात गेले पाहिजेत, ही गरज आहे. ज्यांनी अटकेपार झेंडा फडकवला, अशा थोर बुद्धिवान महाराजांची जयंती प्रत्येक घराघरात साजरी झाली पाहिजे.

--------------

rat20p7.jpg-
25884
नाणीज ः येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. या वेळी काढण्यात आलेली मिरवणूक.

नरेंद्राचार्य महाराज इन्स्टिट्यूटमध्ये
शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात
नाणीज, ता. २० : येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
सकाळी ढोलताशांच्या दणदणाटात आणि जय भवानी, जय शिवाजीच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज, सईबाई, राजमाता जिजाऊ तसेच मावळ्यांचे आकर्षक वेश परिधान करून लहान मुलांनी शिवकाल सजीव केला. निशाण, राजमुद्रा व विविध किल्ल्यांची देखणी पोस्टर्स मिरवणुकीचे वैभव वाढवत होती. सर्व विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. नाणीजधाम महाद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन केले. मिरवणुकीनंतर शाळेत बालसभा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाला ओमेश्वरी ताई, मुख्य विश्वस्त शांताराम दर्डी, प्राचार्या डॉ. अबोली पाटील, वेदपाठशाळेचे प्राचार्य भोसले व हितेश गुरूजी उपस्थित होते. या वेळी चौथी व आठवीतील विद्यार्थ्यांनी ''शककर्त्यांचा मेरूमणी तू राजर्षींचा राजा'' हे गीत तर सहावीतील विद्यार्थ्याने पोवाडा सादर केला. पाचवीतील करण साळवीने “राजा छत्रपती माझा महाराजा अवतरला” हे गीत सुमधूर स्वरांत गायले. ओमेश्वरीताई यांनी छत्रपतींचे पराक्रम, दूरदृष्टी, शिस्त आणि स्वाभिमान हे गुण विद्यार्थ्यांनी जीवनात आत्मसात करावेत, असे प्रेरणादायी विचार मांडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT