25914
आकेरी-हुमरसची शाळा
‘सुंदर शाळा’ स्पर्धेत प्रथम
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० : ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा ३’ स्पर्धेत प्राथमिक गटात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आकेरी हुमरसने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, गावचे मुंबई मंडळ यांनी विशेष परिश्रम घेऊन या शाळेत भौतिक, शैक्षणिक व मूलभूत सोयी सुविधा निर्माण केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती तळवणेकर यांचे उत्कृष्ट नेतृत्व, केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर यांचे मार्गदर्शन, सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन राबविलेले शैक्षणिक, सामाजिक उपक्रम, स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांचे विशेष यश यांसह सर्वच उपक्रम हुमरस गावाच्या सर्वांगीण विकासात विशेष भर टाकणारे ठरले. शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या यशासाठी शाळा व्यवस्थापन समिती, भौतिक व विद्यार्थी विकसन समिती, माजी विद्यार्थी संघ, ग्रामपंचायत हुमरस, सर्व पालक, ग्रामस्थांनी अथक मेहनत घेतली. त्यांचे मुख्याध्यापक तळवणेकर यांनी विशेष आभार मानले.