26035
असलदे गावठणवाडी येथे
छत्रपती शिवरायांना वंदन
नांदगाव, ता. २० ः असलदे गावठण येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात झाला. यावेळी दिंडी भजनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. लहान मुलांच्या भाषणांनी अंगावर शहारे आणले. प्रतिवर्षाप्रमाणे असलदे गावठण येथे ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ असलदे गावठण यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. सायंकाळी दीपप्रज्वलन, मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ झाला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. स्थानिक भजनांनी परिसर भक्तिमय केला. दिंडी भजनाने सोहळ्यात रंगत आणली. ग्रामविकास मंडळ व शिवसाई मित्रमंडळ असलदे गावठण यांच्या वतीने शिवभक्तांचे आभार मानले.
-------
26034
तेर्सेबांबर्डेत मोफत वाहन व्यवस्था
कुडाळ, ता. २० ः रुपेश कानडे मित्रमंडळातर्फे व ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांच्या नियोजनाने सलग नवव्या वर्षी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र कुडाळ व माणगाव येथे जाण्या-येण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली.
या उपक्रमाबाबत विद्यार्थी व पालकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे, सरपंच रामचंद्र परब, संतोष डिचोलकर, गुणाजी जाधव, महेंद्र मेस्त्री, माधवी कानडे, प्रणाली साटेलकर, गणपत दळवी, नंदकुमार कोरगावकर, नीलेश डगरे, दाजी बगळे, सुहास बांबर्डेकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.