कोकण

गिरणी कामगारांचा कुडाळात २८ ला मेळावा

CD

गिरणी कामगारांचा
कुडाळात २८ ला मेळावा
कुडाळ : मुंबईतल्या   घरांसाठी आंदोलनबाबत दिशा ठरवण्यासाठी २८ ला येथील बॅरीस्टर नाथ पै विद्यालय येथे सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्यावतीने गिरणी कामगार व वारसदारांचा मेळावा होणार आहे. मेळावा सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे. त्याला उपस्थितीचे आवाहन सर्व श्रमिक संघटनेचे संघटक शांताराम परब यांनी पत्रकातून केले. मुंबईत घरे देण्याबाबत कालबद्ध धोरण जाहीर करण्याच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. आता मुंबईतच घराचा हक्क मिळविण्यासाठी सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने गिरणी कामगार आणि वारसदारांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उदय भट, वी. के. आंबे, विजय कुलकर्णी , संतोष मोरे, सखाराम महाडिक,  दगडुबुवा यादव, तुकाराम निकम आदी मुंबईहून उपस्थित राहणार आहेत. तरी जिल्ह्यातील  गिरणी कामगार व वारसदारांनी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. परब यांनी केले.
---
26121
रामपाल महाराज

भंडारा सोहळ्यात
सहभागाचे आवाहन
कुडाळ : जगतगुरु तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या सानिध्यात संत गरीबदासजी महाराज यांच्या ३०० व्या बोधदिनाच्या निमित्ताने विशाल भंडारा सोहळा २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सतलोक आश्रम ढवळवाडी (जि.अहिल्यानगर) येथे आयोजित केला आहे. यावेळी संत गरीबदास महाराजांच्या अमरवाणीचे अखंड पाठ होणार आहेत. या सोहळ्यात हुंडा मुक्त विवाह, रक्तदान शिबिर, निःशुल्क नामदीक्षा,  अध्यात्मिक प्रदर्शनी आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.   जिल्ह्यांतून या भंडारा उत्सवाला मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सतलोक आश्रम नामदान केंद्र कुडाळचे दिलीप दास श्री ठाकूर यांनी केले आहे.
.......................
कुडाळात उद्या
गाडगे महाराज जयंती
कुडाळ : येथील श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघाच्यावतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती सोमवारी (ता.२३) श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे आयोजित केली आहे. हा उत्सव सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. केवळ धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमच नव्हे, तर समाजासाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण प्रदेश परिट (धोबी) सेवा मंडळाचे अध्यक्ष शांताराम भाऊ कदम आणि खजिनदार नंदकुमार राखे उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्यातील परिट समाजातील सर्व ज्ञातीबांधवांनी या जयंती उत्सवास आणि आरोग्य शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे तालुका अध्यक्ष सदानंद अणावकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT