कोकण

फाटलेले ओठ, टाळूवर मोफत शस्त्रक्रिया शिबिर

CD

फाटलेले ओठ, टाळूवर
मोफत शस्त्रक्रिया शिबिर
वेंगुर्ले : ऑपरेशन स्माईल आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने जन्मतः फाटलेले ओठ व टाळू असलेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन १३ मार्च ते २० मार्च दरम्यान केले आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा मिळणार असून अनेक बालकांना नवजीवन देण्याचाप्रयत्न या माध्यमातून होणार आहे.
सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून रुग्णांसाठी भोजन, वास्तव्य तसेच प्रवासाची व्यवस्था देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील गरजू रुग्णांनाही या संधीचा लाभ सहजपणे घेता येणार आहे. शस्त्रक्रियेपूर्व तपासणी शिबिर १ मार्चला सकाळी १०वाजता तुळस येथे श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालयात होणार असून पात्र रुग्णांची निवड याच दिवशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी असून इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी डॉ. सचिन परूळकर यांच्याशी संपर्क साधावा.
.......
महाराष्ट्र दिव्यांग संघात
गांवकर- डोंगरेची निवड
आचरा : उत्तरप्रदेश मेरठ येथे २५ ते २८ फेब्रुवारीला होणाऱ्या १४ व्या नॅशनल पॅरासिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी महाराष्ट्रच्या दिव्यांग महिला संघाची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. या संघात आचरा गावची सुकन्या शिल्पा गांवकर-डोंगरे हिची निवड केली आहे. व्हॉलीबॉल पॅरासिटींग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने १४ व्या नॅशनल पॅरा सिटींग व्हॉलीबॉल चॅम्पियनशीप दिव्यांग महिलांच्या महाराष्ट्र २०२६ च्या संघाची निवड चाचणी स्पर्धा नुकतीच नागपूर येथे पार पडली. यापूर्वी नाशिक येथे झालेल्या पहिल्या युनायटेड राष्ट्रीय मास्टर्स क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन शिल्पा हिने कांस्यपदक पटकाविले होते. या निवडीबद्दल शिल्पा हिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
........
सावंतवाडी येथे
शिवजन्मोत्सव सोहळा
सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या येथील शाखेच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. यानिमित्ताने कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी रॅली काढण्यात आली. पालकमंत्री नीतेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने परिसरात भगवामय वातावरण निर्माण झाले होते. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री नीतेश राणेंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर रॅलीला‌ प्रारंभ करण्यात आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा निनादल्या. गांधी चौक येथे या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर गांधी चौक येथे सभेचा प्रारंभ झाला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन, युवराज लखमराजे भोंसले, प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, बजरंग दलाचे कृष्णा धुळपनवर, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दिनेश गावडे, स्वागत नाटेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT