चिपळुणात मंगळवारी मोफत
अस्थी-सांधेदुखी तपासणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः बदलत्या जीवनशैलीमुळे कामाचा वाढता ताण, अपुरी शारीरिक हालचाल तसेच चुकीच्या आहारपद्धतीमुळे आज अनेक नागरिक हाडे व सांधेदुखीच्या समस्यांनी त्रस्त आहेत. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, मणक्यांचे विकार तसेच हाडांची कमजोरी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील अपरांत हॉस्पिटलच्यावतीने नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने मोफत अस्थी घनता व सांधेदुखी तपासणी शिबिराचे आयोजन २४ फेब्रुवारीला करण्यात आले आहे.
शिबिर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत अपरांत हॉस्पिटल येथे होणार आहे. शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. श्रीश भास्करवार (कन्सल्टंट ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन) यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात मोफत बोन डेन्सिटी टेस्ट करून हाडांची मजबुती तपासली जाणार आहे. यासोबतच मणक्यांचे विकार, फ्रॅक्चर, विकृती, मणक्याच्या कॅन्सरची प्राथमिक तपासणी, मणक्यातील क्षयरोग तपासणी, मणक्याचे फ्रॅक्चरवरील तपासणी, ऑर्थोपेडिक अपघात व फ्रॅक्चर तपासणी तसेच शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासणीसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.