कोकण

बी. के. गोंडाळ यांचा विचाराचा वारसा पुढे नेऊया

CD

बी. के. गोंडाळ यांच्या
विचारांचा वारसा पुढे नेऊया
शीळमध्ये शोकसभा ; स्मृती जतन करण्याचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २१ ः (कै.) बी. के. गोंडाळ यांनी लावलेले हे ज्ञानाचे रोपटे जोपासणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात शीळ येथे दिवगंत बी. के. गोंडाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या चिरंतन स्मृती जतन करण्याचा निर्धार करण्यात आला.
शहरानजीकच्या शीळचे रहिवासी, ज्ञानसागर वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आणि जुवाठी हायस्कूलचे शिक्षक बी. के. गोंडाळ यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त ज्ञानसागर वाचनालय येथे शोकसभा झाली. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष गोपाळ गोंडाळ, गोंडाळ यांचा मित्रपरिवार, संस्थांचे प्रतिनिधी, वाचनालय परिवार व घरपरिवारातील सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचनालयाचे सचिव संतोष मोंडे यांनी त्यांचा अल्प परिचय आणि कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमिक शिक्षक संतोष हातणकर, रवींद्र नागरेकर, सर्वोदय प्रतिष्ठानचे वासुदेव गोंडाळ, माय राजापूरचे जगदीश पवार, राजापूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन पाडावे, दिशा परिवाराचे जोशी, जुवाठी मित्रपरिवारातील संदीप घेवडे आदींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kolhapur Danoli killing case : दानोळी २५ लाखांच्या अपहरण करून खून प्रकरणाला नवे वळण; एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम, गुप्तांगाला दिला विजेचा शॉक

Pune Airport: पुणे विमानतळ धावपट्टीचे काम पावसाळ्यानंतरच; उन्हाळी हंगामामुळे दुरुस्ती लांबणीवर, ‘नोटम’ कालावधीत काम होणार!

जातीचा दाखला कैसा बनाया? सहर शेख अडचणीत, ४ कार्यालयांना फसवलं; नगरसेवकपद धोक्यात

Nirav Modi Extradition Update : नीरव मोदीला भारतात आणलं जाणार? CBIची टीम लंडनमध्ये

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं टेन्शन आणखी वाढणार... रोहित शर्मा MI vs PBKS मॅच खेळणार की नाही? जाणून घ्या काय आहे अपडेट

SCROLL FOR NEXT