26186
भरीव नुकसानभरपाई
देण्याची वेंगुर्ल्यातून मागणी
वेंगुर्ले, ता. २१ : जिल्ह्यातील आंबा व काजूसाठी झालेल्या नुकसानभरपाई संदर्भात पालकमंत्री नीतेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळेल. मात्र, जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीखाली शासन निर्णयाप्रमाणे तातडीची मदत म्हणून हेक्टरी २२ हजार रुपये एवढी न भरीव स्वरूपात भरपाई मिळावी, अशी मागणी आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांतर्फे शासनाकडे करण्यात आली.
याबाबत शुक्रवारी तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष श्यामसुंदर राय, युवराज ठाकूर, तुकाराम परब, आत्माराम तांडेल, संजय कोंडुसकर, नितीन लिंगोजी, सदाशिव नवार, रवींद्र परब आदी आंबा-काजू बागायतदार उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.