कोकण

सैनिक भवन देशभक्तीचे प्रेरणास्थान

CD

26197

सैनिक भवन देशभक्तीचे प्रेरणास्थान

दीपक केसरकर : वेर्लेत माजी सैनिक उत्कर्ष मंडळाच्या भवनाचे लोकार्पण

सावंतवाडी, ता. २१ : माजी सैनिकांनी जिद्दीने उभारलेले वेर्ले येथील भवन केवळ इमारत नसून येणाऱ्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरेल, असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी काढले. माजी सैनिक उत्कर्ष मंडळ वेर्ले यांच्यावतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच माजी सैनिक भवनाचे उद्‍घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, निवृत्त सुभेदार मेजर ज्ञानदेव मोरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ, सरपंच रूचिता राऊळ, पंचायत समिती सदस्य प्रथमेश सावंत, बाळकृष्ण राऊळ, चंद्रकांत राणे, राजाराम राऊळ, उपसरपंच मोहन राऊळ, बाळकृष्ण लिंगवत, हनुमंत राणे, महादेव राणे, निवृत्त राजाराम राऊळ, भास्कर कोचरेकर, दीपक राऊळ, भरत गावडे, अशोक राऊळ आदींनी सहभाग घेतला.
माजी सुभेदार मेजर मोरे यांनी ही माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले. शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांसाठी ऊर्जा आणि प्रेरणेचा स्रोत असून, त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी मानवंदना असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी आजी-माजी सैनिकांनी उभारलेल्या या सैनिक भावनासह नव्यानेच उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कौतुक केले. सैनिकांनी स्वबळावर हे काम करून स्वतःचा एक आदर्श निर्माण केला आहे. ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर राहून देशाची सेवा करतात तसेच ते आपल्या भूमीसाठी तेवढे तप्तर असतात हे दाखवून दिले, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. या सोहळ्यास वेर्ले व परिसरातील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. माजी सैनिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. शेवटी माजी सैनिक संघटनेच्या वतीने मान्यवरांचे आभार मानले.
---
एकत्रित काम समाजाला दिशादायी!
‘हे भवन केवळ इमारत नसून येणाऱ्या पिढीसाठी देशभक्तीचे प्रेरणास्थान ठरेल. मतदारसंघातील विकासकामे आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. यावेळी केसरकर यांनी संघटनेचे कौतुक केले तसेच आपण सर्वजण एकत्र येऊन जे काम करत आहात ते समाजाला दिशा देणारे आहे,’ असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT