कोकण

दहावीच्या पहिल्याच पेपरला २५ विद्यार्थ्यांची दांडी

CD

दहावीच्या पहिल्या पेपरला २५ विद्यार्थ्यांची दांडी
चिपळूण तालुक्यातील चित्र ; १५ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॉच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : चिपळूण तालुक्यात दहावीच्या परीक्षेलाही शुक्रवारपासून शांततेत सुरुवात झाली. एकूण १५ केंद्रांवर सुरू झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी २५ विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असून, सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्यात आला आहे.
तालुक्यातून यंदा दहावी परीक्षेसाठी एकूण २ हजार ५९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी मराठी माध्यमातून २ हजार ४२९ विद्यार्थी असून, पहिल्या मराठी पेपरला २३ विद्यार्थी अनुपस्थित होते. उर्दू माध्यमातून १६७ विद्यार्थी विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २ विद्यार्थी गैरहजर राहिले. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी २५ विद्यार्थ्यांनी पहिला पेपर दिला नाही तर २ हजार ५७१ विद्यार्थी शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्याकडे वाटचाल करत परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा केंद्र परिसरात शांतता राखण्यात आली होती. गैरप्रकार टाळण्यासाठी केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व तपास पथकेसतर्क होती. मंडळाच्या आदेशानुसार, सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात येत असून, कॉपीमुक्त व शांततेत पहिला पेपर पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
----
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एका केंद्रावर एका दिव्यांग विद्यार्थ्यासाठी लेखनिकाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वतंत्र बैठक व्यवस्था व पेपर सोडवण्यासाठी अतिरिक्त एक तास देण्यात आला.
-----
खेडमधील दोन केंद्र चिपळूणला जोडली
तालुक्यात अलोरे, असुर्डे-आंबतखोल, भोम, युनायटेड हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, धामणंद, कामथे-टेरव, खेर्डी-सती, रामपूर, सावर्डे, वहाळ, आंबडस, परांजपे, मिरजोळी आणि पेढे-परशुराम या १५ केंद्रांवर परीक्षा सुरू आहे. यावर्षी केंद्रांच्या पुनर्रचनेनुसार खेड तालुक्यातील धामणंद व आंबडस ही दोन केंद्रे चिपळूण तालुक्याला जोडण्यात आली असून, चिपळूणमधील मार्गताम्हाणे हे केंद्र गुहागर तालुक्याशी संलग्न करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT