कणकवलीत आज विशेष
ई-कचरा संकलन मोहीम
कणकवली, ता. २१ : कणकवली नगरपंचायतीतर्फे उद्या (ता.२२) शहरात विशेष ई-कचरा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘पेहेल-२०२६’ या सिंधुदुर्गातील सर्वांत मोठ्या ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानाअंतर्गत ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम कणकवली नगरपंचायत व पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
या अभियानासाठी शहरात दोन ठिकाणी ई-कचरा संकलन केंद्रांचे नियोजन केले आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत विद्यामंदिर प्रशाला प्ले ग्राउंड येथे, तर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांना ई-कचरा जमा करता येणार आहे. पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि ई-कचऱ्याचे जबाबदारीने व्यवस्थापन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. निवासी सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये तसेच कॉर्पोरेट संस्था या मोहिमेत संकलन केंद्रे म्हणून सहभागी होत आहेत. पेहेल-२०२६’ अभियानांतर्गत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ५० ठिकाणी ई-कचरा संकलन केंद्रे उभारण्यात आली असून, जिल्हास्तरावर समन्वयाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी घरात पडून असलेले इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल उपकरणांचा कचरा या केंद्रांवर जमा करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. संकलित ई-कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. पुनर्वापरयोग्य लॅपटॉप, संगणक व टॅबलेट दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू शाळा व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वापरासाठी वितरित करण्यात येणार आहेत. उर्वरित ई-कचरा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अधिकृत केलेल्या रिसायकलिंग केंद्रांकडे पाठविला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.