कोकण

-निवेंडी, धामणसेमध्ये एमआयडीसीसाठी अधिसूचना जारी

CD

‘निवेंडी, धामणसे एमआयडी’साठी अधिसूचना जारी
भूसंपादनाची प्रक्रिया सुरू; जमिनींवर शासनाचा शिक्का, भरपाईची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी संपादित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१च्या कलम ३२ (२) अन्वये उपविभागीय अधिकारी (रत्नागिरी) यांनी आज ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या अधिसूचनेनुसार, निवेंडी गावातील सुमारे १.९२ हेक्टर आणि धामणसे गावातील २.७९ हेक्टर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये निवेडीतील सर्वे नं. ३६, ३७, ४३, ४५, ४५ आणि धामणसेमधील सर्वे नं. १०५, १६९ मधील ठराविक हिश्श्यांचा समावेश आहे. या जमिनींचा वापर भविष्यात उद्योगधंदे उभारण्यासाठी किंवा औद्योगिक वसाहतीच्या सोयीसुविधा विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित जमिनींच्या विक्रीवर, हस्तांतरणावर किंवा कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या काळात कोणीही जमिनीचा व्यवहार केला किंवा त्यावर सुधारणा करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी कोणतीही भरपाई दिली जाणार नाही तसेच, भूसंपादन कायद्यानुसार (२०१३) या जमिनींचा ताबा घेताना योग्य नुकसान भरपाई देण्याची तरतूदही करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
----
आक्षेप नोंदवण्यासाठी १५ दिवसांची मुदत
ज्या जमीनमालकांना किंवा या जमिनीशी संबंधित इतर व्यक्तींना या निर्णयावर काहीही आक्षेप घ्यायचा असेल त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी आपले लेखी म्हणणे पुराव्यांसह रत्नागिरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. ज्यांना प्रत्यक्ष सुनावणी हवी आहे त्यांना सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आपले म्हणणे मांडता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Weather: मुंबईला प्रदूषणाचा विळखा! हवेचा दर्जा खालावला; धोक्याची पातळी ओलांडल्याने आरोग्यतज्ज्ञांचं महत्त्वाचं भाकीत

Crime: लग्नाआधीच मेहंदी समारंभावेळी दोन्ही बहिणींनी जीवन संपवलं; एक तांत्रिक संबंध समोर; मृत्यूचं नेमकं गूढ काय?

बापरे! लिव्हर कॅन्सरनंतर दीपिकाच्या पोटात निघाली गाठ, अभिनेत्री व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आता मला खूप जास्त भीती...'

Sangli Miraj Crime : घरखर्चासाठी पोटच्या दोन मुलांची चाळीस हजारांत विक्री, मिरजेतील महिलेचे कृत्य; संशयित मनपाच्या रुग्णालयातील

India Brazil Trade: ब्राझीलकडून मिळणार खनिजे; संरक्षण क्षेत्रातील सहकार्यालाही आणखी बळ

SCROLL FOR NEXT