-ratchl२१४.jpg ः
P२६O२६२१३
चिपळूण ः लोटे येथे कंपनीविरोधात छेडलेले आंदोलन.
---------
लोटेतील जनआंदोलनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नागरिक, पर्यावरणप्रेमींकडून नाराजी ; लढा तीव्र करण्याची शपथ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी इंडस्ट्रीज विरोधातील जनआंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गेल्या ३० दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव आणि राजू आंब्रे हे कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करत ठिय्या मांडून बसले आहेत. या आंदोलनाला महिना झाला तरी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलक, पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कंपनीकडून पीएफएएस (PFAS) सारख्या रसायनांचे उत्पादन होत असल्याची भीती व्यक्त करत स्थानिक नागरिक व पर्यावरणवादी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. शिवजयंतीनिमित्त आंदोलनस्थळी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. असंख्य युवक-युवती, महिला व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून कंपनीविरोधात लढा तीव्र करण्याची शपथ घेतली. कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला दाभोळखाडी परिसर संघर्ष समिती, भोई समाज तसेच अन्य स्थानिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. दाभोळखाडी परिसर संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय जुवळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आंदोलनस्थळी उपस्थित राहून समर्थन जाहीर केले.
-----
कोट
हा लढा कोणत्याही पक्षाचा नसून, जनतेच्या अस्तित्वाचा आहे. सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला तर कोणतेही सरकार हा प्रश्न दुर्लक्षित करू शकणार नाही.
- अशोकराव जाधव, आंदोलनकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.