कोकण

रत्नागिरी जिल्ह्यात १६ मे पासून गृह गणना

CD

रत्नागिरी जिल्ह्यात १६ मे पासून गृह गणना
१६ वर्षांनंतर होणार घरांची नोंदणी; सुट्टीत शिक्षक कामगिरीवर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : देशातील जनगणनेच्या प्रक्रियेला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, त्याचा पहिला टप्पा असलेली ‘गृह गणना’ रत्नागिरी जिल्ह्यात येत्या १६ ते ३० मे या कालावधीत राबवली जाणार आहे. सुमारे १६ वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर ही गणना होत असून, भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ती पूर्णपणे डिजिटल पद्धतीने म्हणजेच मोबाइल ॲपद्वारे पार पडणार आहे. ही जबाबदारी पुन्हा शिक्षकांवर येणार असल्याने मे महिन्याच्या सुट्टीत हे कार्य करावे लागणार आहे.
दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. यापूर्वी २०११ च्या जनगणनेचा पहिला टप्पा म्हणून २०१० मध्ये गृह गणना करण्यात आली होती. नियमानुसार २०२० मध्ये ही प्रक्रिया होणे अपेक्षित होते आणि प्रशासकीय तयारीही पूर्ण झाली होती, परंतु कोरोना महामारीमुळे ही गणना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. आता २०२७ च्या मुख्य जनगणनेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरांची यादी आणि गृह गणना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या मोहिमेसाठी १६ मे ते ३० मे हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने २०२७ च्या जनगणनेला मंजुरी दिली असून, ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच गृह गणनेत घराचा क्रमांक, मालकाचे नाव, घराचा प्रकार (पक्के/कच्चे), घराचा वापर (निवासी किंवा व्यावसायिक), घरातील एकूण सदस्य संख्या आणि पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, स्वयंपाकघर व ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांची सविस्तर नोंद केली जाणार आहे. या माहितीमुळे नागरिकांच्या राहणीमानावरून त्यांची आर्थिक स्थिती स्पष्ट होणार असून, भविष्यात विविध शासकीय योजनांचे अचूक नियोजन करण्यासाठी या डेटाचा मोठा उपयोग होणार आहे.
यावेळच्या गणनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पहिली ''डिजिटल जनगणना'' असणार आहे. पूर्वीप्रमाणे कागदी अर्जांऐवजी आता मोबाइल अॅपचा वापर केला जाणार असल्याने माहिती संकलनासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. ही मोहीम उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत राबवण्यात येत असून, याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना या उन्हाळी सुटीत या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कामगिरीवर जावे लागणार आहे.

चौकट
नियोजनाला सुरुवात
जिल्हा प्रशासनाकडून या गृह गणनेसाठी आतापासूनच नियोजनाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील ही गृह गणना यशस्वी झाल्यानंतर फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घराची स्थिती, लोकांच्या गरजा आणि उपलब्ध सुविधांची अचूक माहिती या मोहिमेद्वारे संकलित केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT