कोकण

खेडमधील ११४ पैकी ९८ ग्रामपंचायतींवर प्रशासक

CD

खेडमधील ११४ पैकी ९८ ग्रामपंचायतींवर प्रशासक
सरपंचच कारभार सांभाळणार ; शासनाच्या निर्णयाने समाधान
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २२ : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींपैकी मुदत संपलेल्या ९८ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचच आता कारभार सांभाळणार आहेत. याबाबतची ग्रामविकास विभागाची अधिसूचना २० फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. उर्वरित १६ ग्रामपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नसल्याने तिथे विद्यमान कार्यकारिणीच कार्यरत राहणार आहे.
प्रशासक नियुक्तीचे अधिकार आणि तरतूद प्रशासकीय अडचणींमुळे किंवा अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत घेणे शक्य नसल्यास, शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत. या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. सहा महिन्यांचा कालावधी या निर्णयानुसार, संबंधित ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी असेल तोपर्यंत) ''प्रशासक'' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पंचायतीचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ''प्रशासकीय समिती'' देखील स्थापन करण्यात आली आहे.
सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण शासनाच्या या निर्णयामुळे तालुक्यातील सरपंचांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंत केवळ लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव असलेल्या सरपंचांना आता प्रशासकीय प्रमुखाची भूमिका बजावता येणार आहे. केवळ कागदोपत्री प्रशासक न नेमता स्थानिक लोकप्रतिनिधींनाच झुकते माप दिल्याने ग्रामीण भागातील विकासकामे रखडणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुरीकवठे-कर्नाटक रस्त्याने दळणवळण सुधारणार; विजयपूरपर्यंत होणार महामार्ग; मंत्री नितीन गडकरींची घाेषणा..

SCROLL FOR NEXT