शिवकालीन युद्धकलांच्या
थराराने लांजावासीय मंत्रमुग्ध
मराठा संघाचा उपक्रम ; गुरुकुलम संस्थेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २२ ः शिवजयंतीचे औचित्य साधून लांजा तालुका मराठा संघाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकांनी लांजावासियांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. कोल्हापूर येथील वेंगरूळ-भुदरगडच्या ‘गुरुकुलम’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नेत्रदीपक खेळांमुळे तहसील कार्यालयाचा परिसर अक्षरशः शिवकालीन शौर्याने न्हाऊन निघाला होता.
युवा पिढी सक्षम, संयमी, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित व्हावी, या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लांजा तहसील कार्यालयासमोर उभारलेल्या ४०×४० फुटांच्या भव्यदिव्य व्यासपीठावर गुरुकुलमचे संस्थापक आणि महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित लखन दिलीप जाधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे थरारक खेळ सादर झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्राचीन भारतीय युद्धकलेचे विविध प्रकार अत्यंत कौशल्याने सादर केले. त्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक व्यायाम आणि लाठी-काठीचे प्रकारांचा समावेश होता. भाला, पट्टा, बाणा आणि विटा यांचे चित्तथारक प्रयोगही त्यांनी दाखवले. फ्री गदगा लढाई आणि अश्वारूढ कौशल्याप्रमाणेच लिंबू काढणी (पटकाप) यांसारखी कठीण प्रात्यक्षिकांना लांजावासियांनी दाद दिली.
या संपूर्ण प्रात्यक्षिक कार्यक्रमात गुरुकुलमचे सुरज नलवडे, वीर जोंधळे, मारुती सावंत, हर्षवर्धन काळे, प्रसन्न शेळके, दिगंबर रेडेकर, आदिराज पाटील यांच्यासह प्रीती जाधव, धनश्री अतिग्रे, स्नेहा झुरे, तन्वी काळे, श्रेया ढेरंगे आणि उर्वी भिडे या विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन कौशल्याचे दर्शन घडवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.