कोकण

खारेपाटण येथे यशवंत कांबळेंचा सन्मान

CD

26385

खारेपाटण येथे यशवंत कांबळेंचा सन्मान
तळेरे : शेर्पे गावचे रहिवाशी, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटणचे माजी अध्यक्ष तथा निवृत्त प्राथमिक शिक्षक यशवंत कांबळे यांचा नुकताच खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ व संघमित्रा महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. खारेपाटण पंचशीलनगर बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम झाला. खारेपाटण जिल्हा परिषद सदस्या प्राची ईसवलकर, पंचायत समिती सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, पंचशील विकास मंडळ खारेपाटणचे अध्यक्ष भरत पाटणकर, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा संकिता पाटणकर, बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण संघटनेचे सचिव सागर पोमेडकर, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर पाटणकर, खारेपाटण ग्रामपंचायत माजी सदस्य योगेश पाटणकर, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सायली तुरळकर आदी उपस्थित होते. येथील नागरिकांनी दिलेल्या शुभेच्छा यशस्वी जीवन जगण्यासाठी कायमस्वरुपी स्मरणात राहतील, असे श्री. कांबळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT