26389
पुतळ्यांचे दहन करण्यापेक्षा
स्वतःची कुवत ओळखा
साक्षी वंजारी : शिवसेनेवर टीका
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे दहन केले, ते कृत्य हास्यास्पद आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, ज्यांचे अस्तित्व केवळ युतीवर अवलंबून आहे, त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील नेत्यावर टीका करण्यापूर्वी आपला अभ्यास आणि आपली उंची तपासायला हवी होती, अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी केली.
वंजारी यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे, की राहुल गांधी हे हॉर्वर्ड विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेले आणि देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जाणारे नेते आहेत. भारत-अमेरिका व्यापार करारासारख्या गंभीर विषयावर बोलण्यासाठी जितका अभ्यास लागतो, तितकी कुवत या पदाधिकाऱ्यांची नाही. संजू परब यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. पुतळे जाळण्यापेक्षा जगभरात गाजत असलेल्या ‘एपस्टाईन फाईल’ प्रकरणावर किंवा मुंबईसह राज्यातून रोज बेपत्ता होणाऱ्या लहान मुली आणि महिलांच्या सुरक्षेसाठी आंदोलने केली असती, तर ते जनतेला जास्त आवडले असते. भविष्यात महिलांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यात मोठे आंदोलन करण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.