कोकण

कुडाळ मारुती मंदिराचा उद्यापासून वर्धापन दिन

CD

कुडाळ मारुती मंदिराचा
उद्यापासून वर्धापन दिन
कुडाळ ः येथील बाजारपेठेतील श्री देव मारुती मंदिराचा वर्धापन दिन सोहळा २४ व २५ फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. २४) सकाळी मंदिरात धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी सातला कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे ट्रिकसीनयुक्त ‘एकपदा त्रिमूर्ती’ अर्थात पृथ्वीकंकण नाटक, बुधवारी (ता. २५) सायंकाळी सातला तिरंगी भजन सामना होणार आहे. सद्गुरू संगीत मंडळ पिंगुळीचे बुवा वैभव सावंत, श्री देवी सातेरी मंडळ पावशीचे बुवा अरुण घाडी, कोटेश्वर मंडळ हरकुळ बुद्रुक (कणकवली) बुवा सुमित परब यांच्यात हा सामना रंगणार आहे.
......................
शिरोड्यात बुधवारी
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः शिरोडा येथील गांधी चौकातील जागृत देवस्थान श्री देव ब्राह्मण पिंपळपार देवस्थानचा १३ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. २५) विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त लघुरुद्र, सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी श्री दत्त माऊली भजन मंडळाचे भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन गांधी चौक व्यापारी व ग्रामस्थांनी केले आहे.
---
गणित परीक्षेमध्ये
शुभ्रा नाईकचे यश
मसुरे ः महाऱाष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूलची पाचवीची विद्यार्थिनी शुभ्रा नाईक हिने विशेष प्राविण्य मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. गणित प्रज्ञा परीक्षेसाठी तिची निवड झाली आहे. मुख्याध्यापिका देवयानी गावडे, संस्थाध्यक्ष अजयराज वराडकर यांच्यासह शिक्षक, पालकांनी तिचे अभिनंदन केले.
...................
नईबाग येथे उद्या
दशावतार नाटक
आरोंदा ः नईबाग तार येथे मंगळवारी (ता. २४) रात्री ११ वाजता दरवर्षीप्रमाणे आरोस येथील जय हनुमान पारंपरिक दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी साडेचारला सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, पावणी कार्यक्रम, साडेसहाला जीवन विद्या मिशनचा हरिपाठ होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन नईबाग ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुरीकवठे-कर्नाटक रस्त्याने दळणवळण सुधारणार; विजयपूरपर्यंत होणार महामार्ग; मंत्री नितीन गडकरींची घाेषणा..

SCROLL FOR NEXT