कोकण

डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी प्रथम

CD

26503

डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी प्रथम

मडुरा येथील स्पर्धा; ‘छत्रपती शिवप्रेमी’ ग्रुपचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः मडुरा येथील छत्रपती शिवप्रेमी व्हाट्सॲप ग्रुपतर्फे शिवजयंती निमित्त आयोजित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत रेडी येथील समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक मिळविला. देवस्थान समिती सचिव संतोष परब यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
मडुरा येथे छत्रपती शिवप्रेमी ग्रुपतर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात झाला. यानिमित्त सकाळी प्राणप्रतिष्ठा, शिवपूजन व दीपपूजन झाले. गावात भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रात्री श्री देवी माऊली मंदिर सभागृहात खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा झाली. यात प्रथम समर्थ गवंडी (रेडी), द्वितीय वैष्णवी परब (मडुरा) व जान्हवी शेर्लेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. बांदा नाबर प्रशालेत ‘बेस्ट अथलेटिक्स प्लेयर’ पुरस्कार प्राप्त रुद्र मोरजकर यालाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देवस्थान समिती सचिव संतोष परब, मानकरी दत्ताराम परब, ग्राम कमिटी अध्यक्ष दिलीप परब, गोविंद परब, परीक्षक रोहन तांबोस्कर, आशिष तांदुळे, शिक्षक धर्मराज खंडागळे, आयोजक पिंटो परब उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण रोहन तांबोस्कर, आशिष तांदुळे यांनी केले. प्रा. नवसो परब यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्राथमिक शाळा व मडुरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनपटावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT