26466
चिंदर येथे ठाकरे सेनेतर्फे
निःशुल्क नेत्र चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. २२ ः ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित मोफत नेत्र चिकित्सा शिबिर, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व माफक दरात चष्मा वाटप कार्यक्रम चिंदर सातेरी मंदिर येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर व ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी संजय हडपी यांच्या हस्ते झाले.
या शिबिराचा एकूण १६५ लाभार्थींनी लाभ घेतला. यात १६ जणांना मोतिबिंदू शस्त्रक्रिया ओरोस येथे शिवसेना पक्षाच्यावतीने करण्यात येणार आहे. तसेच ९० जणांना चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. सचिन हरमलकर, डॉ. गणपत अणावकर, ग्रामपंचायत सदस्य व आचरा विभाग संघटक पप्पू परुळेकर, आचरा महिला विभाग प्रमुख संजना रेडकर, चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर, आचरा उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, कविराज परब, प्रसाद टोपले, रंजन प्रभू, नारायण परब, संजय हडपी, माजी सरपंच भाग्यश्री घागरे, विनोद केळुसकर, मिथुन माळगावकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.