26469
शिवविचारांचा वारसा अखंड जपा
प्रमोद कामत ः बांदा केंद्रशाळेत शिवजन्मोत्सव उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २२ ः छत्रपती शिवराय हे महान योद्धा, स्वराज्याचे संस्थापक, तसेच सुजाण प्रशासक व द्रष्टे राष्ट्रनिर्माता होते. एका आदर्श प्रशासकाला आवश्यक असणारी शिस्त, जोखीम स्वीकारण्याचे धाडस, न्याय, दूरदृष्टी, विवेक, अखंड परिश्रम हे सर्व गुण त्यांच्या ठायी होते. छत्रपती शिवरायांचा हा वारसा श्री स्वराज्य प्रतिष्ठानने पुढे न्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कामत यांनी येथे केले.
श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने येथील पीएमश्री केंद्रशाळा क्र. १ च्या मैदानावर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात श्री. कामत बोलत होते. या ठिकाणी प्रतिष्ठानच्यावतीने भव्य किल्ल्याची प्रतिकृती उभारली होती. व्यासपीठावर सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बांदा पंचायत समिती सदस्या ऋतिका नाईक, तांबोळी पंचायत समिती सदस्या प्रियांका देसाई, वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक गुणेश गवस, डॉ. भक्ती महाजन-आळवे, अॅड. चैतन्या सावंत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, घारपी प्रशाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य कामत, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई, रत्नाकर आगलावे यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी पारंपरिक पद्धतीने व पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत शिवजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. संस्थेच्यावतीने आठ दिवसांत शालेय, महाविद्यालयीन गटात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकांचे वितरण झाले. वीरेंद्र आठलेकर व जे. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब उपस्थित होते.
---
वेशभूषा स्पर्धेचा निकाल
अंगणवाडी गट-राज सावंत, अन्विता वालावलकर (अंगणवाडी मोरगाव), अद्विक जाधव (सावंतवाडी), साईरा लाड (अंगणवाडी निमजगा), वीरेन चौगुले. पहिली ते तिसरी-सार्थक वालावलकर (सावंतवाडी), देवांशी बहिरे, अन्वी माळकर (इन्सुली), गार्गी निब्रे (पीएमश्री बांदा क्र. १), स्वरा कदम (मोरगाव क्र. १). चौथी ते सहावी-सर्वज्ञ वराडकर (पीएमश्री बांदा क्र. १), दुर्वा नाटेकर (दिव्य ज्योती स्कूल बांदा), तनिष्का देसाई (साई विद्या मंदिर), वेदांत चौगुले (पीएमश्री बांदा क्र. १), परिधी वायंगणकर (होली क्रॉस हायस्कूल). सातवी ते दहावी-मृदुला सावंत (दिव्य ज्योती बांदा), नैतिक मोरजकर (खेमराज हायस्कूल बांदा), दिक्षा वरक (खेमराज हायस्कूल बांदा), रुषदा देसाई-कळंगुटकर (दिव्य ज्योती बांदा), भाविका धुरी (इन्सुली).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.