कोकण

भरतीतील परप्रांतीयांची घुसखोरी थांबवा

CD

26529

भरतीतील परप्रांतीयांची घुसखोरी थांबवा

जिल्हाधिकाऱ्यांना साकडे; ...अन्यथा तीव्र आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय नोकरभरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना डावलून इतर जिल्ह्यांतील उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर निवड होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, या अन्यायाविरोधात आता ‘स्वाक्षरी मोहीम’ राबवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या काळात झालेल्या वर्ग ३ च्या तलाठी व लिपिक भरतीमध्ये आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. या भरतीतील निव्वळ २८ उमेदवार सिंधुदुर्गचे असून, उर्वरित १५६ उमेदवार पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, अमरावती आणि खानदेश भागातील आहेत. बाहेरील उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्याला केवळ ‘नोकरी मिळवण्याचे साधन’ मानत आहेत.
नोकरीअभावी येथील तरुण मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे खासगी नोकरीसाठी वळत आहेत. परिणामी, गावेच्या गावे ओस पडत असून, केवळ सणासुदीलाच घरांची दारे उघडली जात आहेत. परजिल्ह्यातील कर्मचारी रुजू झाल्यावर अवघ्या २-३ वर्षांत राजकीय वरदहस्ताने आपली बदली मूळ जिल्ह्यात करून घेतात. यामुळे पदे पुन्हा रिक्त होतात आणि शासनाचा वेळ व पैसा वाया जातो. बाहेरील कर्मचाऱ्यांना स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि संस्कृतीची ओढ नसल्याने शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात उदासीनता दिसून येते.
प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेऊन स्थानिक तरुणांना न्याय दिला नाही, तर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते रमण वाईरकर व अन्य स्थानिक नागरिकांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री नीतेश राणे, आमदार नीलेश राणे, दीपक केसरकर, भास्कर जाधव आणि माजी आमदार वैभव नाईक यांना पाठवण्यात आल्या आहेत.
----
७० टक्के पदे आरक्षित ठेवा!
जिल्ह्यात पुरेशी मार्गदर्शन केंद्रे नसल्याने स्थानिक मुले ‘एमपीएससी’सारख्या परीक्षांमध्ये मागे पडत आहेत. जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. यात सर्व शासकीय भरतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांसाठी ७० टक्के पदे आरक्षित ठेवावीत. भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांमार्फत न राबवता जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांच्यामार्फत राबवावी, अशा मागण्या केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT