सोनवडे विद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिर
साखरपा ः सोनवडे (ता. संगमेश्वर) येथील माध्यमिक विद्यालयात एका करिअर मार्गदर्शन शिबिर झाले. देवरुख कॉलेजचे ग्रंथपाल सुभाष मायंगडे यांनी दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांच्या करियरवर प्रकाश टाकला. दहावीनंतर काय या विषयावर तयार करण्यात आलेल्या एका विशेष प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करियरची माहिती दिली. या वेळी संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, उपाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, ताम्हाणे विद्यामंदिराच्या शिक्षिका वर्षा पाटोळे आदी उपस्थित होते.
आठल्ये-सप्रे महाविद्यालयात शिवजयंती
साखरपा ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते झाले. या वेळी उपप्राचार्य सरदार पाटील, पर्यवेक्षक एम. आर. लुंगसे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही पदयात्रा महाविद्यालयातून सुरू होऊन मातृमंदिर, माणिक चौक, बस स्थानक, शिवाजी चौक या मार्गाने जाऊन पुन्हा महाविद्यालयात येऊन समारोप करण्यात आला.
घाटिवळेत जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धा
पाली ः घाटिवळे मराठा संघ मुंबई आणि ग्रामस्थांतर्फे ४ मार्चला रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे. स्पर्धा घाटीवळे कदमवाडी ग्रामदेवतेच्या सहाण येथे होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांची नावनोंदणी २५ फेब्रुवारीपर्यंत करायची आहे. अधिक माहितीसाठी अमित सक्रे यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.