कोकण

पर्यावरणपूरक प्रकल्पाचे स्वागत करावे

CD

- rat२२p८.jpg-
२६O२६३४३
चिपळूण ः पोसरे येथील कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री उदय सामंत.
----------------

पर्यावरणपूरक प्रकल्पाचे स्वागत करा
उदय सामंत ः पोसरे येथे मंदिरात कलशारोहण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आदी अनेक भागात एमआयडीसी होण्यासाठी शेतकरी सातबारे घेऊन मागे लागतात. मात्र आपल्या जिल्ह्यात नेमकी उलटी परिस्थिती आहे. येथील शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक प्रकल्पाचे नेहमी स्वागत केले पाहिजे. गावागावांनी असे ठरवले तर राज्यातील उद्योगांचा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याकडे पाहिले जाईल. एमआयडीसी होण्यासाठी तुम्ही आग्रह धरा, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पोसरे येथील कार्यक्रमात केले.
तालुक्यातील पोसरे येथील श्रीदेवी नवलाई, श्रीदेवी वाघजाई, श्री देव खेम, लखोबा देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी सामंत म्हणाले, पोसरे ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जी विकास कामे सुचवली, ती कामे लवकरच पूर्ण करू. त्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. येथील ग्रामस्थांनी रोजगार निर्मितीसाठी कारखाना उभारण्याची मागणी केली. जिल्ह्यात एमआयडीसी उभी करताना जास्त विरोध केला जातो. रोजगार निर्मितीसाठी आपण साडेतीन हजार कोटींचा कोकोकोलाचा प्रकल्प, लोट्यात रेल्वेचा प्रकल्प तसेच रत्नागिरी येथे ३० हजार कोटीचा सेमी कण्डक्टरचा कारखाना आणला. जिल्ह्यातील ग्रामस्थांनी नेहमी पर्यावरण प्रकल्पाचे स्वागत केलं पाहिजे. या वेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, तालुकाप्रमुख रूपेश घाग, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या मयुरी शिर्के, पंचायत समिती सदस्या पूजा जवरत, सामाजिक कार्यकर्ते नासिर खोत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : धारावीतील परवाना नसलेल्या ठिकाणी औषध साठा जप्त

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT