कोकण

जिल्हा नगर वाचनालयाला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार

CD

जिल्हा नगर वाचनालयाला
सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
रत्नागिरी, ता. २२ : महाराष्ट्रातील सर्वांत जुने वाचनालय असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाला सौ. शोभना वसंत केळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार घोषित झाला आहे. हा पुरस्कार विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात २६ फेब्रुवारीला ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आशाताई खाडिलकर यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
स्वा. सावरकरांच्या ६० व्या आत्मार्पण दिनानिमित्ताने अटलसेवा केंद्रातर्फे आयोजित कार्यक्रमाचे औचित्य साधत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. २१ हजार रुपये आणि सन्मान असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय दीर्घकाळ वाचनसंस्कृती जतन करत आहे. १८२८ साली नेटिव्ह लायब्ररी नावाने स्थापन झालेले हे वाचनालय २०० वर्षांच्या उंबरठ्यावर डौलाने उभे असून, एक लाख १५ हजारांची ग्रंथसंपदा या वाचनालयाचे वैभव आहे. नामांकित वाचनालयाला सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर करताना मनस्वी आनंद होतो, असे अटल सेवा केंद्राचे प्रवर्तक सुनील मोने यांनी सांगितले. सौ. शोभना वसंत केळकर यांनी केलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातून समाजाला सातत्याने प्रेरणा मिळत राहावी, या हेतूने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Car Bomb Attack : आमदार शौकत मोल्ला यांच्या कारवर बॉम्ब हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ!

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Talegaon Chakan Road: तळेगाव-चाकण मार्गावर युवक बनले ‘देवदूत’! तातडीच्या प्रयत्नांमुळे अपघात टळले, नेमकं काय घडलं!

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडजवळ भीषण आग

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT