kan231.jpg
26634
कलमठ : येथील ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त
कलमठकडून स्वच्छता अभियान
कणकवली, ता. २३ : कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आपल्या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जयंतीनिमित्त विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कलमठ बाजारपेठ शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. ग्रामस्थ, पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वच्छतेचा संदेश दिला. याप्रसंगी सरपंच संदीप मेस्त्री म्हणाले की, जगाला ग्रामस्वच्छतेचा संदेश देत स्वच्छता हीच सेवा मानणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे. संत गाडगेबाबांनी समाजात स्वच्छतेची चळवळ उभी केली आणि त्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, गुरू वर्देकर, प्रवीण कुडतरकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, नितीन पवार, अनुप वारंग, स्वाती नारकर, प्रमोद पवार, विद्या लोकरे, इंदू डगरे, सुप्रिया देसा, एकता फाटक, कीर्ती मेस्त्री, वैदेही खरात, पूजा हुन्नरे, शुभांगी सावंत, साक्षी राडये, मधुरा परब, ज्योती जाधव, वसंत सावंत, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, जयेश मेस्त्री उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.