26930
चित्रकला, वक्तृत्व स्पर्धेला
आजगावात उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा. ता, २३ : राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानांतर्गत एकता प्रभागसंघ मळेवाड अंतर्गत स्थापन झालेल्या शिवप्रेमी बालसभेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विलासानंद मठकर, मदन मुरकर, सुनील गोवेकर, बीआरपी प्राची राऊळ, मळेवाड समन्वयक अनुप देऊलकर, प्रभाग व्यवस्थापक प्रचिती मडुरकर, मैत्री ग्रामसंघ अध्यक्ष प्रिया आजगावकर, सचिव अवंती नाईक, ग्रामसखी उमा आजगावकर, छाया हरमलकर, सरोज रेडकर आणि बालसभा अध्यक्ष कनक काळोजी यांची उपस्थिती होती.
श्री. मठकर यांनी बोग्राम संघाच्या कार्याचे कौतुक केले. मुलांमधील अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे ही प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. स्पर्धेचा निकाल असा ः चित्रकला स्पर्धा-प्रथम प्रिशा गोवेकर, वेदा शेटकर (विभागून), द्वितीय कैवल्य पांढरे, गौरव पांढरे (विभागून), तृतीय तेजल पांढरे, स्वरा हळदणकर (विभागून), उत्तेजनार्थ-संचित पांढरे, महंत पांढरे. वक्तृत्व स्पर्धा-आराध्या नाईक, दुर्वा शेटकर, वसंत नाईक, उत्तेजनार्थ सई गवंडे. स्पर्धेचे परीक्षण श्री. मुरकर व सुनील गोवेकर यांनी केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेसाठी मार्मिक सेवामंडळ (मुंबई) यांनी बक्षिसे पुरस्कृत केली. आजगाव उपसरपंच सुशील कामटेकर यांनी अल्पोपहार दिला. प्रिया आजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. उमा आजगावकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.