कोकण

सर्वोच्च स्थानासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा

CD

swt233.jpg
26650
तळेरे ः येथे वीर गाथा ५.० या प्रकल्पात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसोबत मान्यवर.

सर्वोच्च स्थानासाठी सर्वोत्तम प्रयत्न करा
विजय टक्के ः तळेरे प्रज्ञांगणतर्फे ‘५.०’ च्या गुणवंतांचा गुणगौरव
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. कुठलेही क्षेत्र निवडले तर त्यामध्ये सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यामध्ये सातत्य पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पोलिस पदक प्राप्त सेवानिवृत्त पोलिस अधिकारी विजय टक्के यांनी केले. ते येथे आयोजित सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
येथील प्रज्ञांगण, अक्षरोत्सव परिवार आणि सिंधू फाउंडेशन यांच्या वतीने भारत सरकारच्या वीर गाथा ५.० या प्रकल्पात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मुलांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन विजय टक्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने तर उदय दुधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर, तळेरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, विधी मुद्राळे, ‘अक्षरोत्सव’ प्रमुख निकेत पावसकर, प्रज्ञांगण प्रमुख श्रावणी मदभावे, सतीश मदभावे आदी उपस्थित होते.
यावेळी वीर गाथा ५.० मध्ये देशात १० वे स्थान मिळविलेली सावी मुद्राळे (कासार्डे माध्यमिक विद्यालय), राज्यात आठवा क्रमांक मिळविलेली वेदिका तेली (कासार्डे माध्यमिक विद्यालय), जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्रावणी पांचाळ (तळेरे माध्यमिक विद्यालय), समीक्षा पाटणकर (तळेरे माध्यमिक विद्यालय) आणि राष्ट्रीय कला उत्सवामध्ये देशात प्रथम स्थान मिळालेल्या संगीत शिक्षक संदीप पेंडूरकर (खारेपाटण माध्यमिक विद्यालय) यांना विशेष सन्मानपत्र, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.
विविध शैक्षणिक उपक्रमात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत विधी मुद्राळे यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी सावी मुद्राळे, विधी मुद्राळे, संदीप पेंडुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी श्री क्लासेस आणि श्रावणी कम्प्युटरच्या मुलांनी विविध ऐतिहासिक वेशभूषा केल्या. श्रावणी मदभावे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश मदभावे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hanumant Pawar Threat Allegation : हनुमंत पवारांकडून धमक्या व शिवीगाळ; हिंदुत्ववादी तुषार दामगुडे यांचा आरोप, “संविधानाच्या चौकटीत लढणार”

India vs Pakistan सामना १४ जूनला! ICC च्या निर्णयाने सर्वांना झटका; १२ संघांचा समावेश असलेल्या मोठ्या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक

Dombivli News: प्रवाशाची झडती, रिक्षात धारधार शस्त्रे अन्...; डोंबिवलीत संशयास्पद ऑटो चालक ताब्यात, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पुणेकरांचे आरोग्य धोक्यात, धूळ आणि धूर यामुळे अनेकांना श्वासनाचे आजार

IND vs AUS: स्मृती मानधनाला हरमनप्रीत ऐवजी अचानक का करावं लागलं टीम इंडियाचं नेतृत्व? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT