कोकण

गुणवत्ता हा स्पर्धेत टिकण्याचा ''महामंत्र''

CD

26653
कट्टा ः येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.

गुणवत्ता हा स्पर्धेत टिकण्याचा ‘महामंत्र’

सुनील नाईक ः कट्टा हायस्कूलमध्ये मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २४ : आजचे युग हे स्पर्धेचे आणि संघर्षाचे आहे. या संघर्षात टिकून राहण्यासाठी आणि यशाची शिखरे गाठण्यासाठी ‘गुणवत्ता’ हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन संस्थेचे पदाधिकारी सुनील नाईक यांनी कट्टा येथे केले.
डॉ. काकासाहेब वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन व निरोप समारंभ झाला. मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी आगामी माध्यमिक शाळा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. परीक्षेत यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि अभ्यासाचे नियोजन कसे असावे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. पर्यवेक्षक महेश भाट व इतर शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमास स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर, सहसचिव साबाजी गावडे, शिक्षक के. एम. हडलगेकर, ई. एस. राऊळ, समीर चांदरकर, एस. एस. चांदरकर, एस. आर. दळवी, ए. एस. परब, भूषण गावडे व शिक्षकेतर कर्मचारी के. एन. कुबल उपस्थित होते. दहावीच्या वतीने ध्रुवी भाट व हर्षल कानुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच पी. व्ही. कानुरकर, एस. सी. पेंडुरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वर्गशिक्षक बी. एम. वाजंत्री यांनी शाळेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. ऑनलाइन मार्गदर्शन आणि जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांची तयारी उत्तम झाल्याचे नमूद केले. संस्थेचे विश्वस्त निवृत्त कर्नल शिवानंद वराडकर, अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, खजिनदार रवींद्रनाथ पावसकर आणि सर्व संचालक मंडळासह सल्लागार नारायण पेणकर, सुहास वराडकर, संतोष साटविलकर व व्हिक्टर डॉन्टस यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्वराली ताम्हणकर व माऊली थवी यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एम. शिरोडकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत डंपरची स्कूटीला धडक; थरारक अपघातात दुचाकी चालक बचावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT