कोकण

शिव प्रतिष्ठानतर्फे कोळोशीत शिवजयंती

CD

शिव प्रतिष्ठानतर्फे कोळोशीत शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २३ ः प्रतिवर्षाप्रमाणे शिव प्रतिष्ठान कोळोशी यांच्या वतीने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी रणरागिणींचे टाळ वादन व लेझीम लक्षवेधी ठरले. राजकोट मालवण येथून मशाल घेऊन पायी कोळोशीकडे आणण्यात आली. रात्री ढोल-ताशांच्या गजरात मशालीचे कोळोशी येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवजयंतीदिनी सकाळी ग्रामपंचायत कोळोशी येथील शिवप्रतिमेचे पूजन, महिला टाळपथक व महिला लेझीम पथक, सवाद्य मिरवणूक आदी कार्यक्रम झाले. गावढणवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन, शिव आरतीने परिसर शिवमय झाला. दुपारी मान्यवरांचे स्वागत व सत्कार, महिलांसाठी हळदीकुंकू, लहान मुलांसाठी विविध फनी गेम्स पार पडले. सायंकाळी सुस्वर भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. रात्री लकी ड्रॉ सोडत व त्यानंतर श्री पावणादेवी लोककला हरकुळ खुर्द यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग ''क्रोधासूर वध'' सादर करण्यात आला.
.....................
swt238.jpg
26654
मुंबई ः योग शिबिरात मार्गदर्शन करताना शेखर बांदेकर.

ध्यान शिबिरास मुंबईत प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २३ ः चक्रधर ज्ञाती संस्था यांच्या वतीने रविवारी (ता. २२) बोरीवली, मुंबई येथील श्री शिरोडकर गुरुजी प्रणित दत्तमंदिर येथे योग, प्राणायाम व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिरोडकर गुरुजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक डॉ. प्रकाश आर्लेकर, प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त तसेच फिटनेस योग अकॅडमी सिंधुदुर्गचे योगशिक्षक शेखर बांदेकर यांची उपस्थिती लाभली. यावेळी रामदास रेडकर, महेश वाडकर, शंभू आर्लेकर, श्रीमती शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात योगशिक्षक बांदेकर यांनी योग, प्राणायाम आणि सूक्ष्म व्यायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यास केल्यास आपण उत्साही, सकारात्मक आणि रोगमुक्त जीवन जगू शकतो, असे प्रतिपादन केले. या शिबिरास संस्थेचे सभासद तसेच परिसरातील योगप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधात फिर्याद, ८ जणांविरुद्ध गुन्हा!

Latest Marathi News Update: नेस्कमधील कॉन्सर्टचा आणखी एक व्हिडिओ समोर, अनेकांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केल्याचा ही अंदाज

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

SCROLL FOR NEXT