कोकण

माळी गुरूजींना अपेक्षित समाजकार्य करा

CD

- rat२३p१०.jpg-
26O26669
राजापूर ः कै. गुणाजी माळी गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर. या वेळी उपस्थित दीपक नागले, प्रभाकर वारीक आणि मान्यवर.
-----
माळी गुरुजींना अपेक्षित समाजकार्य करा
चंद्रकांत बावकर ः कुणबी समाजोन्नती संघातर्फे पुण्यतिथी साजरी
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २३ ः कुणबी समाजाला संघटित करताना समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने कै. गुणाजी माळी गुरुजी यांनी स्थापन केलेली कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ही १०५ वर्ष कार्यरत असणारी सामाजिक संघटना आहे. भविष्यामध्ये कै. माळी गुरुजी यांचे विचार पुढे नेणे आणि त्यांना अपेक्षित असलेले समाजकार्य करणे हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन कुणबी समाजोन्नती संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केले.
कुणबी समाजोन्नती संघाचे संस्थापक कै. गुणाजी माळी गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुणबी समाजोन्नती संघातर्फे राजापूर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. काल (ता. २२) झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या कुणबी समाजबांधवांसह विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या व्यक्तींचा गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी अध्यक्ष दीपक नागले, सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर, प्रभाकर वारीक, भोसले यांच्यासह रवींद्र नागरेकर, अनिल जुवळे, स्वप्नील माळी, संजय वारीक, जितेंद्र पाटकर, श्रीकांत राघव, सुभाष नवाळे, सुरेश ऐनारकर, विद्याधर गोठणकर, अ‍ॅड. जान्हवी दिवटे यांच्यासह मोठ्या संख्येने कुणबी बांधव उपस्थित होते. या वेळी बावकर यांनी कै. माळी गुरुजी यांनी विखुरलेला कुणबी समाज संघटित करण्यासह समाजाची सर्वांगीण प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाचा मनोगताद्वारे आढावा घेतला. निर्भय बनून संघर्ष केल्यास आपण सर्व क्षेत्रामंध्ये यशस्वी होऊ तसेच आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत राहा; मात्र कुणबी समाज आणि समाजासाठी योगदान देणारे कै. माळी गुरुजी यांचे योगदान विसरू नका, असा मौलिक सल्लाही बावकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Government Scheme: मोफत लाभ घ्या सरकारकडून! या 7 सरकारी योजनांचा फायदा तुम्ही घेताय का? अनेकांना तर याची माहितीच नाही...

Nashik Bike Theft : नाशिकमध्ये दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच वेळी सहा वाहने लंपास, वाहनधारकांमध्ये संतापाची लाट

Nashik Industrial Fire : सातपूर हादरले! वासाळीत दोन प्लॅस्टिक गुदामांना भीषण आग; एक कोटींचे साहित्य खाक

Latest Marathi News Live Update : येरवडा भूमी अभिलेख कार्यालयाच्या आवारात भीषण आग; ६० वाहने जळून खाक

Solapur News: माळशिरसच्या तलाव, बंधाऱ्यांत ४० टक्के पाणीसाठा; गतवर्षी चार गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा, संभाव्य टंचाई आराखडा तयार!

SCROLL FOR NEXT