- rat२३p३.jpg ः
OP२६O२६६५९
मंडणगड: पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सत्कार करताना प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे व विद्यार्थी.
----
मुंडे महाविद्यालय पथनाट्यात द्वितीय
मंडणगड ः येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातील विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल मंडणगड परिसरातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खेड येथील सहजीवन शिक्षणसंस्थेच्या आयसीएस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नुकत्याच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्र. प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभये यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे व डॉ. अशोक साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत यशासाठी विशेष परिश्रम घेतले.
rat२३p४.jpg-
P२६O२६६६०
मंडणगड ः निवळी नदीवर बंधारा बांधताना एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक व ग्रामस्थ.
------
मुंडे महाविद्यालयाच्या
स्वयंसेवकांनी बांधले बंधारे
मंडणगड ः येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने तसेच भिंगळोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने भिंगळोली येथील निवळी नदीवर दोन बंधारे बांधण्यात आले. कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी डोंगरउताराची जमीन असल्यामुळे पावसाचे पाणी साठत नाही. त्यामुळे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेनुसार डोंगरी भागात पाणी साठवण करणे गरजेचे असून, उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती डॉ. महेश कुलकर्णी यांनी दिली. या उपक्रमात ग्रामपंचायत अधिकारी पवन गोसावी, विद्या खेडकर, संदेश चिले, रवींद्र शिगवण, तेजेस गोठल, समीर जाधव, तसेच महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप निर्वाण, डॉ. महेश कुलकर्णी, स्वयंसेवक-स्वयंसेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक परहर व उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.