कोकण

''मोंगा'' ठरतोय रोजगाराचा आधार

CD

Rat२३p७.jpg -
२६O२६६७३
चिपळूण ः मडक्यामध्ये मोंगा तयार झाल्यानंतर केळीच्या पानावर असे ओतले जाते.
Rat२३p८.jpg-
२६O२६६७४
मोंगासाठी आवश्यक वाल्याच्या शेंगांची गोवळकोट मध्ये अशी शेती केली जाते.
-----
चिपळुणात ‘मोंगा’ ठरतोय रोजगाराचा आधार
पार्ट्यांना जोर ; वाशिष्टी काठी पावटे विक्रीतून महिलांना उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः कोकणात सध्या थंडीचा कडाका वाढत असतानाच ‘मोंगा पार्टी’ आणि त्यातून मिळणारा व्यवसाय यांचा एक घट्ट ऋणानुबंध निर्माण झाला आहे. थंडीमुळे मोंगा पार्ट्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, ही परंपरा आता केवळ चवीपुरती मर्यादित न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा एक महत्त्वाचा उपक्रम ठरत आहे. मोंगासाठी प्रामुख्याने गावठी पावट्याची मोठी मागणी असते. यामुळे वाशिष्टी नदीच्या किनारी असलेल्या अनेक गावांमधील महिलांना रोजगाराचे उत्तम साधन उपलब्ध झाले आहे. पहाटेपासूनच शेतातून पावटा काढणे, तो सोलणे आणि विक्रीसाठी उपलब्ध करून देणे या प्रक्रियेत अनेक कुटुंबांचा सहभाग वाढला आहे.
थंडी सुरू झाली की चिपळूण तालुक्यांमध्ये मोंगा पार्ट्यांची रेलचेल सुरू होते. थंडी, शेकोटी आणि मातीच्या मडक्यात शिजणारी आपल्या आवडीचा जिन्नस यांचा संगम म्हणजे मोंगा पार्टी. ही केवळ जेवणाची पद्धत नसून, ती एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आता व्यावसायिक स्वरूप धारण करणारी परंपरा बनली आहे. शेतात मिळणाऱ्या ताज्या भाज्या-वालाच्या शेंगा, बटाटे, कांदे, रताळी, मक्याची कणसे, तसेच इतर आवडीच्या भाज्या आणि पनीर या सर्व घटकांना मसाल्यांमध्ये एकत्रित करणे म्हणजेच मोंगा. त्यात अंडीही टाकली जातात. यामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शेतात सहज उपलब्ध होणारा भांबुर्डाचा पाला होय. थंडीच्या रात्री शेकोटीभोवती बसून मित्र-परिवारासोबत गप्पा मारत मोंगा खाण्याची मजा काही औरच असते. आज अनेक शेतकरी, रिसॉर्ट मालक, ढाबे आणि पर्यटन व्यावसायिक थंडीच्या हंगामात खास मोंगा पार्टीचे आयोजन करत आहेत.
साधारणपणे रिसॉर्ट आणि फार्महाऊस मालक एका व्यक्तीमागे मोंगा पार्टीसाठी ५०० ते ७०० रुपये आकारतात. तर थोड्याफार अधिक सुविधा असलेल्या फार्महाऊसमध्ये हा दर १ हजार रुपयांपर्यंत असतो. त्यामुळे थंडीच्या मोसमातील या मोंगा पार्टीमुळे साधारणपणे काही लाखांच्या घरात उलाढाल होते. थंडीच्या दिवसांत निसर्गाच्या सांनिध्यात वेळ घालवण्यासाठी अशा मोंगा पार्ट्यांना पसंती दिली जात आहे. यामुळे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळत आहे. कमी भांडवलात केला जाणारा हा व्यवसाय थंडीच्या हंगामात चांगला नफा देऊन जातो.
----
अशी बनवतात पोपटी
एका मडक्यात तळाला भांबुर्डाच्या पाल्याचा थर त्यावर शेंगा पुन्हा पाला मग पनीर आणि इतर भाज्या असे एकावर एक असे तीन ते चार थर लावले जातात. सोबतीला जाडे मीठ आणि ओवा टाकला जातो. हे मडके भरल्यावर त्याचे तोंड पाल्याचा जाड थर आणि ओल्या मातीने बंद करून ते उपडे ठेवतात. त्याच्या आजूबाजूला पालापाचोळा आणि लाकडे रचून शेकोटी पेटवली जाते.
------
चौकट २
शेंगा विक्रीमध्ये महिलांचा सहभाग
गोवळकोट गावच्या प्रवेशद्वारावर जिथे मगर दर्शन पॉईंट आहे तेथे दहा ते पंधरा महिला वालाच्या शेंगांची विक्री करतात. एका महिलेकडे दहा ते पंधरा किलो वालाच्या शेंगा असतात. ८० १०० ते १२५ रुपये किलो दराने या शेंगांची विक्री होते. आणि त्यातून महिलांना चांगले पैसे मिळतात.
-----
कोट
मोंगा पार्टीमुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट ग्राहक मिळतो. ताजी, सेंद्रिय आणि हंगामी उत्पादने ही मोंगा पार्टीची खास ओळख बनली आहे. मोंगासाठी खाडीकिनारी गावातील कडव्या वालाच्या, पावट्याच्या शेंगांना मोठी मागणी असते. त्यांच्या चवीमुळे आणि स्थानिक ओळखीमुळे या शेंगांना अनेक जण पहिली पसंती देतात.
- मनोज गांधी, मंडल कृषी अधिकारी चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Explainer : चॅटजीपीटी आणि जेमीनीपेक्षा भारी! आलंय नवे मेड इन इंडिया AI App, कुठून करायचं Download अन् कसं वापरायचं? पाहा

Latest Marathi News Live Update : बोरिवलीतील MHB कॉलनी परिसर झाला नशेचा अड्डा, भाजप नगरसेवकाची धाड

Atal Pension Scheme : अटल पेन्शन योजनेसाठी कोण अर्ज करू शकते आणि कोण नाही? पाहा नवे नियम

गौतमी पाटील की राधा पाटील! कोणाची किती संपत्ती? एक गाजवून आली बिग बॉस घर, तर दुसरी स्टेजवर करतेय हवा

SCROLL FOR NEXT